नांदणीत सर्वपक्षीय आघाडीला सहा, तर विरोधी पंचकृष्ण ग्रामविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला़ साकतमध्ये सागर मोरे यांच्या ग्रामविकास आघाडीने नऊपैकी सहा जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले़ तुर्कपिंपरीमध्ये पीरसाहेब ग्रामविकास आघाडीने सातपैकी सहा जागा जिंंकल्या़ बोरगावमध्ये ईश्वर जाधवर व लक्ष्मण जाधवर गटाने चार जागा जिंकल्या़; तर विरोधी आघाडीने तीन जागा जिंकल्या़ कोरफळेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरव माने यांना सहा, तर विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या. तडवळेत रामकृष्ण लोखंडे यांच्या यशवंत ग्रामविकास आघाडीने वर्षकेतू जाधव व मेजर आवारे यांचा सहा जागा घेत पराभव केला़
ममदापूरमध्ये तुळजाभवानी ग्रामविकास पॅनलने सातपैकी सात जागा जिंकत विजयी हॅटट्रिक केली़ भोईंजेमध्ये शिवशंभू ग्रामविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या़; तर साराळेत बाळराजे गाटे गटाने नऊपैकी आठ जागा जिंकल्या़ महागावात जय हनुमान महा़विकास आघाडीने पाच जागा जिंकून विजय मिळवला. वालवडमध्ये अॅॅड. सुभाष जाधवर गटाने सातपैकी पाच जागा जिंकल्या़ धानोरेमध्ये पंचायत समितीच्या समिती सुमंत गोरे यांच्या यमाईदेवी ग्रामविकास आघाडीला सातपैकी सहा जागा मिळाल्या़ काटेगावात सुरेश गाढवे व दगडू पटेल यांच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीला सात जागा मिळाल्या़ खांडवीत गणेश बारंगुळे व रंगनाथ ठाकरे यांच्या खंडेश्वर ग्रामविकास आघाडीला अकरापैकी सहा जागा मिळाल्या़ जामगाव आ़ मध्ये बाळासाहेब जगताप व विष्णू आवटे यांच्या पॅनलला सहा, तर बाळराजे जाधव गटाला तीन जागा मिळाल्या़ सौंदरेमध्ये पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या़; तर चार जागांमध्ये महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखालील चार उमेदवारांनी मोठ्या मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला़ या ठिकाणी आंधळकर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल आंधळकर हे ४०० मतांनी विजयी झाले; तर त्यांच्या भगिनी चैताली आंधळकर-गोटे या बिनविरोध निवडून आल्या. भालगावात जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे यांच्या पॅनलने अनिल घुगे व दादा जाधवर गटाचा धुव्वा उडवत नऊच्या नऊ जागा जिंकून सत्ता ताब्यात ठेवली़
कोरेगावात नाना ढाकणे यांच्या अंबिका ग्रामविकास पॅनलनेही सातपैकी सात जागा जिंकल्या. क़ळंबवाडी पा़ मध्ये सोपल गटाच्या विकास जाधव गटाने सातपैकी चार जागा जिंकत गड कायम ठेवण्यात यश मिळविले़ शेळगाव आरमध्ये सुरेश अडसूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ पैकी सहा जागा जिंकल्या़ या ठिकाणी बाजार समितीचे संचालक वासुदेव गायकवाड व बाबा गायकवाड गटाचा पराभव झाला़ सासुरे येथे महांकाळेश्वर ग्रामविकास आघाडीच्या तात्यासाहेब करंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने नऊच्या नऊ जागा जिंकल्या़ या ठिकाणी पंचायत समितीच्या माजी सदस्या सुरेखा करंडे व त्यांचे पती माजी सरपंच ब्रह्मदेव करंडे या दोघांचा पराभव झाला़ फफाळवाडी-गाताचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतही विद्यमान सरपंच काकासाहेब फपाळ यांच्या गटाने नऊ जागा जिंकत सत्ता कायम राखली़
घाणेगावात बाजार समितीचे उपसभापती झुंबर जाधव व पाटील गटाला सात, तर नितीन मोरे गटाला दोन जागा मिळाल्या़ नारीत केशव घोगरे-रानमाळ यांच्या श्रीराम पॅनलला ११ पैकी आठ जागा मिळाल्या़ इर्लेवाडीत विठ्ठल ग्रामविकास आघाडीने विजय संपादन केला़ धस पिंपळगावात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत धस यांच्या कै़ हरिनाना धस पिंपळगाव ग्रामविकास आघाडीने नऊच्या नऊ जागा जिंकून वर्चस्व अबाधित ठेवले़ या ठिकाणी त्यांचे सर्व विरोधक एकत्र आले होते़ सरपंच असलेला सख्खा चुलत भाऊ त्यांच्या विरोधात होता़ पिंपरी सा़ मध्ये राऊत गटाच्या चेतन काशीद यांच्या गटाला सहा, तर भास्कर काशीद गटाला तीन जागा मिळाल्या़ श्रीपतपिंपरीमध्ये भारत ताकभाते व बाळराजे पाटील यांच्या गटाला सात, तर बाळासाहेब काकडे व कनैय्या पाटील यांच्या गटाला चार जागा मिळाल्या़ यात भारत ताकभाते यांचा मात्र पराभव झाला़ उक्कडगावात श्रीपती घुले यांच्या भगवानबाबा ग्रामविकास आघाडीला नऊपैकी सहा जागा मिळाल्या़