बार्शी : तालुक्यातील ७८ पैकी ५१ ग्रामपंचायतीवर आमच्या गटाने वर्चस्व मिळाल्याचा दावा आमदार राजेंद्र राऊत यांनी करताना सरपंच निवडीनंतर ९४ पैकी सत्तरहून अधिक सरपंच आमच्या गटाचे असतील, असेही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
लक्ष्मी-सोपान बाजार समिती कार्यालयात आ़. राऊत यांना भेटण्यासाठी विजयी उमेदवारांनी गर्दी केली होती. या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, सभापती अनिल डिसले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बाजार समितीचे संचाक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते़.
राऊत म्हणाले, तालुक्यात ९४ गावाच्या निवडणुका होत्या. त्यामध्ये १६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. ही गावे स्थानिक गटांनी एकत्र येत बिनविरोध केली. आम्ही आमच्या गटात धरत नाही़. या गावात ही जवळपास १२ पेक्षा जास्त ठिकाणी स्वत:च्या गटाचे सरपंच झाले आहेत. निवडणुका झालेल्या ७८ गावांमध्ये तुळशीदासनगर, मानेगाव, इर्लेवाडी, अलीपूर, अरणगाव, आळजापूर, आंबेगाव, बळेवाडी, बावी, बाभुळगाव, बोरगाव, भालगाव, भातंबरे, भोईंजे, चिखर्डे, धानोरे, ढोराळे, इंदापूर, गाताचीवाडी/फपाळवाडी, घाणेगाव, घोळवेवाडी, जामगाव (आ), कळंबवाडी (आ), कासारवाडी, काटेगाव, कांदलगाव, कुसळंब, कोरफळे, कोरेगाव, खडकोणी, खांडवी, तांबेवाडी, ममदापूर, नारी/नारीवाडी, नागोबाचीवाडी/लक्ष्याचीवाडी, नांदणी, पांगरी, पांढरी, धसपिंपळगाव, पिंपरी सा, साकत, सासुरे, सारोळे, सावरगाव, तांदुळवाडी, शिराळे, तुर्कपिंपरी, उक्कडगाव, वाणेवाडी, यावली आणि झरेगाव या गा ५१ गावात स्पष्टपणे स्वत:च्या गटाची सत्ता आल्याचे आ़मदार राऊत यांनी सांगितले़.
आगळगाव, दडशिंगे, गौडगाव, कव्हे, मळेगाव, निंबळक, सौंदरे, शेंद्री, तावडी, वालवड व श्रीपतपिंपरी या ११ गावात स्थानिक पातळीवरील आघाड्यांची सत्ता आली आहे़. त्याठिकाणी देखील बहुसंख्य सरपंच राऊत गटाचेच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेल्या उपळेदूमाला येथे दोन गट स्व:तचेच असल्याचे सांगितले.