शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अन् अ दर्जा असलेल्या बार्शी नगरपालिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गतवेळच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. नेत्यांची खांदेपालट होऊन पक्ष बदलही झाले आहेत. निवडणूक राऊत आणि सोपल गटात होणार असे चित्र आहे.
मागच्या निवडणुकीत अपक्ष असलेले राऊत यांचा गट भाजपच्या बॅनरखाली लढणार की स्वतंत्र आणि सोपल आता शिवसेनेत आहेत. ते आंधळकर, मिरगणेंना सोबत घेऊन लढणार का याकडे बार्शीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान होण्यास सुरुवात झाली आहे़. सोपल गटही आता सक्रिय झाला आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये पालिकेची निवडणूक झाली. त्यात चाळीस जागांपैकी २९ नगरसेवक आणि जनतेतून नगराध्यक्ष आ़ राजेंद्र राऊत गटाने निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती. सोपल गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले होते. पाच वर्षांत राजकीय समीकरणात बराच बदल झाला आहे. त्यावेळी माजी आ़ असलेले राऊत आता आमदार आहेत. मागच्यावेळी दिलीप सोपल राष्ट्रवादीत होते. आता ते शिवसेनेत तर त्यावेळी शिवसेनेत असलेले राऊत आता भाजपत आहेत. दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेले विश्वास बारबोले यंदाही त्यांच्यासोबत आहेत. तर शिवसेनेच्या माध्यमातून मागील वेळी निवडणुका जिंकणारे भाऊसाहेब आंधळकर हे ही शिवसेनेत आहेत. भाजपकडून लढलेले राजेंद्र मिरगणे हे भाजपत असले तर ते सोपल-आंधळकर यांच्यासोबत म्हणजे राऊत विरोधी गटात आहेत. वाॅर्ड पुनर्रचनेमध्ये यंदा वाॅर्डांची संख्या वाढेल असे बोलले जात आहे.
राऊत गटाकडे रणवीर,रणजित ही मुुले आणि नगरसेवक भाऊ विजय राऊत आहेत. तर सोपल गटाची पूर्ण भिस्त नागेश अक्कलकोटे यांच्यावर आहे़. तसेच त्यांचे नातू आर्यन सोपल हेही प्रचारात पुढे असतील.
----
विकाची कामे अन् उखडलेले रस्ते
राऊत गटाने शहरात केलेली कामे या बळावर ते मतदारांसमोर जाणार असे त्यांच्या हालचालीवरुन दिसत आहे़ तर दुसरीकडे सोपल-मिरगणे-आंधळकर हे शहरातील उखडलेले रस्ते, राऊत यांची एकाधिकारशाही, सत्तेच्या माध्यमातून झालेली नाराजी आदी मुद्द्यांच्या आधारे राऊत यांना टार्गेट करत आहेत. सोपल यांच्या गटातील अनेक नगरसेवक राऊत गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ही गळती रोखण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर आहे.
----
सोपल,राऊत, आंधळकर, मिरगणे आणि बारबोले यांचे फोटो