पंढरपूर : माणसांनी जीवन जगताना रामाचा आदर्श घ्यावा. भारताची आदर्श पिढी घडविण्यासाठी घराघरांत रामकथा पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत संत साहित्यिक दाजीशास्त्री पणशीकर यांनी व्यक्त केले.श्री संत एकनाथ महाराजकृत व दाजी पणशीकर संपादित भावार्थ रामायण या ग्रंथाच्या सुधारित दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन समर्थ प्रतिष्ठान व यशवंत प्रकाशनतर्फे पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास होते. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, संत तुकाराम महाराजाचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज, ह. भ. प. शंकर महाराज बडवे, भागवताचार्य वा. ना. उत्पात, विठ्ठल महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधव महाराज शिवणीकर, गिरीश जोशी, मुकुंद परिचारक, श्रीकांत लाड, बाळासाहेब आराध्ये, सत्यविजय मोहोळकर, मंगेश मांगले उपस्थित होते.बाजारात पुस्तके येतात व लोप पावतात; मात्र गं्रथ अजरामर राहतात. नव्या पिढीवर संस्कार करून आदर्श नागरिक बनविण्यासाठी गं्रथ उपयोगी पडतात. यासाठी घराघरात गं्रथ असणे गरजेचे असल्याचे पणशीकर म्हणाले. स्वागत डॉ. भागवत कानडे यांनी केले तर प्रास्ताविक प्र. द. निकते यांनी केले. आभार अभिजित आवताडे यांनी मानले.
घराघरांत रामकथा पोहोचावी
By admin | Published: June 12, 2014 1:22 AM