शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सिंहासन, मंगलमूर्ती अन् इकोफ्रेंडली मखरांचा साज; बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज

By दिपक दुपारगुडे | Published: September 11, 2023 5:27 PM

पूर्वी मखर सजवताना साड्यांचा वापर होत असे. परंतु, आता मखरासाठी रेडिमेड पडदे बाजारात दाखल झाले आहेत.

सोलापूर : गौरी-गणपतीच्या आगमनाचे. गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे रेडिमेड मखर बाजारात दाखल झाले असून, आकर्षक मखर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. बालगोपाळांपासून सर्वांचा आवडता सण म्हणजे गौरी-गणपतींचे आगमन. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सोलापुरात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी सोलापुरातील मधला मारुती, टिळक चौक येथे आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.

पूर्वी मखर सजवताना साड्यांचा वापर होत असे. परंतु, आता मखरासाठी रेडिमेड पडदे बाजारात दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यात वा कपड्यापासून तयार केलेल्या खरला सर्वाधिक मागणी होती. परंतु, यंदा बाजारात पर्यावरणपूरक मखरातही विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. यात लाकडाचा, कपड्याचा, वुलनचा वापर करून तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक मखराची मागणी जास्त असल्याची व्यापारी अशोक माळवदकर या व्यापाऱ्यांनी सांगितले.शहरात कपडे, लाकूड, गवत, वुलन अशा इकोफ्रेंडली साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मखरांना जास्त मागणी असून, आद्याप हजारपेक्षा जास्त मखर कोल्हापूर, पुणे अन् मुंबई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गृहिणीचे काम सोपेपूर्वी बांबू, लाकडाचे मखर बनविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत असे. आता मात्र बाजारात नवनवीन डिझाइनमध्ये रेडिमेड मखर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे गृहिणीचे काम हलके आणि सोपे झाले आहे. गणपतीसाठी थर्माकोल मखरऐवजी हॅण्डमेड मखर यांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन, मंगलमूर्ती असे विविध आकार उपलब्ध आहेत. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव