केंद्र सरकारकडून संजय गांधी व राज्य सरकारकडून श्रावणबाळ, वृद्धापकाळ, निराधार, विधवा, अपंग, परित्यक्ता योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन देऊन आधार दिला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवरच या लाभार्थ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. मात्र, गेल्या नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सलग ७ महिने केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान प्रलंबित होते. त्यामुळे पेन्शनवर जगणाऱ्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
योजनेतील लाभार्थी व अनुदान
संजय गांधी (सर्वसाधारण ३७०९ लाभार्थी १ कोटी ८६ लाख ३० हजार, अनुसूचित जाती ४८५ लाभार्थी २८ लाख ७२ हजार २०० रुपये), श्रावणबाळ (सर्वसाधारण ५६०६ लाभार्थी २ कोटी १७ लाख १० हजार रुपये, अनुसूचित जाती १५०० लाभार्थी ७७ लाख ३१ हजार रुपये), वृद्धापकाळ ४७२७ लाभार्थी ८५ लाख ८६ हजार, विधवा २१७ लाभार्थी ३ लाख ९० हजार ६०० रुपये, अपंग २६ लाभार्थी ४६ हजार ८०० रुपये, अशा १६ हजार २६४ लाभार्थ्यांचे ५ कोटी ९८ लाख ८९ हजार २०० रुपये अनुदान प्राप्त झाल्याचे अव्वल कारकून सुरेखा मस्के यांनी सांगितले.