आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्त झालेल्या संचालक मंडळाला समितीच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरून त्यांच्याकडून सहा कोटी ४० लाख रुपये वसूल करण्यात यावेत, असा महत्त्वपूर्ण निकाल ए. डी. सातपुते यांच्या एकसदस्यीय न्यायाधीकरणाने दिला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक लेखापरीक्षणामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ शासनाने बरखास्त करून कुंदन भोळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. माजी संचालक राजशेखर शिवदारे आणि सुरेश हसापुरे यांनी संचालक मंडळाच्या विरोधात केलेल्या तक्रारींची शासनाने दखल घेतली. बाजार समितीच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी ए. डी. सातपुते यांची एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. बाजार समितीच्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेऐवजी सहकारी बँकेत ठेवल्याने आर्थिक नुकसान, अडते आणि व्यापाऱ्यांकडून सेस वसुली मुदतीत न करणे, मूल्यांकनाशिवाय दुकान गाळे भाड्याने देणे आदी गंभीर मुद्यांवर चौकशी करून सातपुते यांनी संचालक मंडळाला आर्थिक नुकसानीस जबाबदार धरले आहे.-------------------------- सेवानिवृत्त सचिवांना भुर्दंडच्सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धनराज कमलापुरे सेवानिवृत्त झाले आहेत. यापूर्वीच्या संचालक मंडळाला बाजार समितीच्या नुकसानीस जबाबदार धरून रकमा वसुलीच्या दृष्टचक्रात अडकविण्यात आले होते; मात्र सचिव कमलापुरे यांना अलिप्त ठेवण्यात आले होते. सातपुते यांच्या एकसदस्यीय न्यायाधीकरणाने निवृत्त झालेल्या धनराज कमलापुरे यांनाही जबाबदार धरले आहे. त्यांच्याकडून १ कोटी १५ लाख रुपये वसुलीचा आदेश देण्यात आला आहे. ---------------संचालकाच्या नावासह वसुल करण्यात येणारी रक्कम- दिलीप माने १ कोटी १५ लाख ७९ हजार- चंद्रकांत खुपसंगे ३० लाख ९२ हजार ३७७- गजेंद्र गुंड ३० लाख ९२ हजार ३७४- प्रवीण देशपांडे ३० लाख ९२ हजार ३७४- केदार विभुते ३ लाख ३५ हजार ५०७- सोजर पाटील३० लाख ९२ हजार ३७४- इंदुमती अलगोंडा ३० लाख ९२ हजार ३७४- शांताबाई होनमुर्गीकर३० लाख ९२ हजार ३७४- अशोक देवकते२७ लाख ९२ हजार १६७- अविनाश मार्तंडे ६ लाख ८७ हजार ८४५- पिरप्पा म्हेत्रे ३ लाख ८७ हजार ६३८- श्रीशैल गायकवाड३० लाख ९२ हजार ३७४- नसीरअहमद खलिफा ३० लाख ९२ हजार ३७४- बसवराज दुलंगे३० लाख ९२ हजार ३७४- उत्रेश्वर भुट्टे३० लाख ४० हजार २४३- हकीम शेख३० लाख ९२ हजार ३७४- सिद्धाराम चाकोते२७ लाख ५६ हजार ८६७- धनराज कमलापुरे (सचिव)१ कोटी १५ लाख ७९ हजार ३७४
सोलापूर बाजार समितीच्या संचालकांकडून ६.४० कोटी वसुल करा, न्यायाधीकरणाचा निर्णय
By admin | Published: July 14, 2017 4:59 PM