शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

सोलापुरात रक्ताचा तुटवडा; मोबाईल व्हॅनद्वारे रस्त्यातच करतात रक्तदान शिबिराची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:41 PM

उन्हाळ्यामुळे झालाय सोलापुरातील पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयाकडे सोलापूर शहरासह जिल्हा, मराठवाडा आणि कर्नाटकाचा काही भाग येथील हजारो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात.उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो. त्यासाठी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कारखान्यांना प्रत्यक्ष, पत्राद्वारे विनंती करण्यात येत आहे.लहान-सहान शिबिरांवर भर दिला जात आहे. जनतेमधून ‘रक्तदानाबद्दल’ जनजागृती व्हावी.

विलास जळकोटकर 

सोलापूर: दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, एकीकडे पिण्यासाठी पाण्याचा आणि रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवतो. यावर्षीही हीच स्थिती जाणवू लागली आहे. शहरातील विविध रक्तपेंढ्यांनी त्यांच्याकडील नियमित रक्तदाते आणि विविध संस्था, कारखान्यांना पत्रांद्वारे शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करावे, या सामाजिक उपक्रमात सहयोग द्यावा, यासाठी जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. 

सोलापूर शहरात मुख्यत्वे दमाणी रक्तपेढी, हेडगेवार रक्तपेढी, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिपत्याखाली असलेली रक्तपेढी याशिवाय बोल्ली, सिद्धेश्वर, अश्विनी रुग्णालयाच्या अंतर्गत अशा रक्तपेढ्यांद्वारे विविध रुग्णालयातील गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्तातील प्लेटलेट, प्लाझ्मा, पांढºया व तांबड्या पेशी पुरवल्या जातात. राष्टÑीय व राज्य महामार्गाला जोडणाºया सोलापूर जिल्ह्यात दळणवळणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे घात-अपघाताच्या घटनाही सातत्याने घडतात. अशावेळी गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने भासणाºया रक्ताची या रक्तपेढ्या गरज भागवतात. साधारणत: वर्षभरात या सर्वच रक्तपेढ्या येणारे सण, उत्सव, सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत पोहोचून रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. 

फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीत मात्र उत्स्फूर्त रक्तदान करण्याचे प्रमाण कमी असते. नेमके  याच कालावधीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. यावर्षीही नेहमीप्रमाणे रक्ताची असणारी निकड लक्षात घेऊन हेडगेवार रक्तपेढीने शहर-जिल्ह्यात आपली मोबाईल व्हॅन गावोगावी फिरवून ‘रक्तदान श्रेष्ठदान’ हा संदेश पोहोचवत लोकांमध्ये जनजागृतीची मोहीम राबवली आहे. त्यांच्याकडे नियमितपणे दर तीन महिन्यांनी रक्तदान करणाºया दात्यांना आठवण करून दिली जात आहे.  पूर्वीच्या रेकॉर्डवर रक्तदान केलेल्या विविध संस्थांनाही पत्र पाठवून आवाहन केले जात आहे. रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, उपाध्यक्ष सतीश मालू, सचिव सत्यनारायण गुंडला यांनीही या उपक्रमासाठी पुढाकार  घेतला आहे. 

हेडगेवार रक्तपेढी वर्षाकाठी शिबिराच्या माध्यमातून १० हजार ५०० बॅगांचे संकलन करते. या रक्ताच्या एका बॅगेमधून प्लेटलेट्स, प्लाझ्मा, क्रायो, आरबीसी (रेड ब्लड टेस्ट) हे घटक रुग्णांना गरजेनुसार दिले जातात. वर्षभरात जवळपास १८ ते २० हजार बॅगांचे वितरण केले जात असल्याचे जनसंपर्क अधिकारी सुनील हरहरे यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर बोल्ली रक्तपेढीत अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाते वाढवण्यासाठी संपर्क अभिमान राबवण्यात  येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास रिकमल्ले यांनी स्पष्ट केले. एकूणच सर्व रक्तपेढ्यांनी रक्त संकलनासाठी जनसंपर्क अभियान मोठ्या प्रमाणात चालवले आहे.

छोट्या कॅम्पवर भर- रक्तामध्ये प्रामुख्याने चार घटक असतात. त्यापैकी प्लेटलेट ४ दिवस टिकते. पांढºया पेशी १ वर्ष टिकतात. तांबड्या पेशी ३५ ते ४२ दिवस टिकतात. रुग्णांसाठी आवश्यक घटकांची मागणी लक्षात घेऊन आम्ही नियमित रक्तदात्यांना पाचारण करतो. विविध ग्रुपच्या दात्यांची यादी आमच्याकडे आहे. सध्या प्लाझ्मा आणि प्लेटलेटची मागणी वाढली आहे.

तांबड्या पेशींची मागणी कमी झाली आहे. अशावेळी कॅम्प घ्यावा की नाही, या स्थितीत आम्ही आहोत. कारण दात्यांकडून घेतलेले रक्त वाया जाऊ नये, अशी भूमिका आहे. सध्या दररोज दोन दात्यांना कॉल करून बोलावण्याचे नियोजन आखले आहे. ५० च्या आसपास बॅगांचे संकलन व्हावे, या दृष्टीने छोट्या कॅम्पवर भर दिला असून, सद्यस्थितीला १ हजार बॅगांचा साठा असल्याचे दमाणी रक्तपेढीचे प्रशासन अधिकारी अशोक न्हावरे यांनी स्पष्ट केले.

रक्तदान करा.. पांडुरंगाचे डायरेक्ट दर्शन मोहीम राबवा- शिर्डी साईबाबा देवस्थान येथे रक्तदानाची चळवळ अधिक रुजावी यासाठी देवस्थान परिसरातच रक्तदानाचा कॅम्प लावला जातो. जो भक्त रक्तदान करतो त्याच्यासाठी थेट व्हीआयपी दर्शनाची सोय केली जाते. या धर्तीवर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठीही अशी मोहीम राबवावी, यासाठी मंदिर समितीला पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे. सध्या दर एकादशीला मंदिर परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे रक्तदान शिबिराची मोहीम राबवली जात असल्याचे हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सुनील हरहरे यांनी स्पष्ट केले.

शासकीय रुग्णालयाकडे सोलापूर शहरासह जिल्हा, मराठवाडा आणि कर्नाटकाचा काही भाग येथील हजारो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. त्याशिवाय घात-अपघाताच्या रुग्णांची संख्या दररोज असतेच. अशावेळी रक्ताची आवश्यकता असते. विशेषत: उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो. त्यासाठी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कारखान्यांना प्रत्यक्ष, पत्राद्वारे विनंती करण्यात येत आहे. लहान-सहान शिबिरांवर भर दिला जात आहे. जनतेमधून ‘रक्तदानाबद्दल’ जनजागृती व्हावी.- डॉ. सुशील सोनवणे, रक्तपेढी प्रमुख, सिव्हिल हॉस्पिटल 

टॅग्स :SolapurसोलापूरBlood Bankरक्तपेढीTemperatureतापमान