१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना लसीकरणास पात्र ठरविण्यात आले आहे. लाभार्थ्याने लसीकरणासाठी कोविन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश लाभार्थ्यांना संगणक हाताळणीचे ज्ञान नाही अथवा ॲन्ड्रॉइड मोबाईल नाही. तसेच ४५ वर्षांवरील लाभार्थी हे संगणक साक्षर नाहीत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी झेडपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शहरी भागासाठी मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली आहे.
माळशिरस व श्रीपूर - महाळुंग नगरपंचायतींसाठी मुख्याधिकारी व उर्वरित गावांसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून कोविन प्रणालीवर नोंदणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत नागरिकांचे ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक यांची राहणार आहे.
कोट ::::::::::::
लसीच्या उपलब्धतेनुसार दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तिंसाठी काही लस राखीव ठेवण्यात येणार आहेत. परंतु पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपली नोंद संबंधित गांवामध्ये करुन टोकन घेणे अत्यावश्यक आहे.
- शमा पवार
प्रांताधिकारी, माळशिरस