मोहोळ : येथील शासकीय सेंटरमधे उपचार घेत असलेल्या बेगमपूरच्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्यूनंतर प्रयत्न करूनही नातेवाइकांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर जमियत उलमा- ए- हिंदच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करीत माणुसकीचे दर्शन घडविले.
बेगमपूर येथील राम सोपान कुंभार (वय ५०) यांच्या वाटेला आलेला हा प्रसंग आहे. कोरोनाची लागण झाल्याने प्रारंभी ते नजीक पिंपरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने ८ मे रोजी त्यांना मोहोळ येथील शासकीय कोरोना केंद्रात हलविले. दरम्यान, ११ मे रोजी त्यांचे निधन झाले. रुग्णालयातील संबंधितांनी त्यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाइकांचा शेवटपर्यंत संपर्क झाला नाही.
अखेर येथील जमियत उलमा- ए- हिंदचे अध्यक्ष हाफीज मुजीब शेख, जिब्राईल शेख, जहीर खैरादी, हाफीज मुजीब सादिक, हाफीज इंतजार अहमद, रमजान तांबोळी, उमर शेख, गणेश धोटे व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहोळ येथील हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार करीत माणुुसकीचे दर्शन घडविले.
----
फोटो : ११ माेहोळ कोरोना
बेगमपूर येथील सोपान कुंभार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना उलमा- ए- हिंदचे कार्यकर्ते.