सीना नदी काठावरील गावाला पाणी टंचाई आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, मिरगव्हाण, कोळगाव, हिवरे, बिटरगाव (श्री) या गावांना पिण्याचे पाणी नाही. जनावरांना पाणी नाही, पिके जळू लागली आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरीही सीना नदीला पाणी आले नाही. कुकडी धरणातील ओव्हरफ्लो पाणी सीना नदीमध्ये ताबडतोब सोडावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सुपनवर यांनी दिला.
यावेळी भाऊसाहेब खरात, लाला काळे, धनंजय मोरे, नाना नलवडे, झुंबर कावळे, पिंटू भागडे, संजय जाधव, नियमन गायकवाड, तात्यासाहेब लोखंडे, बाळासाहेब शिंदे, काका मोगल, उमेश सरडे, नितीन तरगे, दादासाहेब देवकते, शरद घरबुडवे, दिलीप फरतडे उपस्थित होते.
---