शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

शेळीचे दूध पिऊन वाढलेल्या पाडसाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 4:26 PM

निलंग्याहून मेंढपाळाने आणले होते सोलापुरात; वनविभागाच्या मोहिमेला वन्यजीवप्रेमींची साथ

ठळक मुद्देवनविभागाच्या अधिकाºयांनी मेंढपाळाला वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७२ बाबत माहिती दिलीवन्यजीवाला पाळल्यास त्याच्या नैसर्गिककरीत्या जगण्याच्या क्रियेमध्ये आणि निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये बाधा पोहोचत असल्याबाबत जागृतवनविभागाच्या अधिकाºयांना सकारात्मक प्रतिसाद देऊन मेंढपाळाने पाडसाला वनविभागाच्या स्वाधीन केले

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : सोरेगाव येथे एका मेंढपाळाकडे पाडस आढळून आले. वनविभाग व नेचर कॉन्झर्वेशनच्या सदस्यांनी या पाडसाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. विशेष म्हणजे मुक्त करण्यात आलेले पाडस शेळीचे दूध पिऊन वाढले होते.

बुधवारी दुपारी सचिन पाटील आणि प्रशांत चांदणे यांनी एसआरपी कॅम्पजवळील शेतामध्ये चरायला आलेल्या शेळ्या- मेंढ्यांच्या कळपात हरणाचे पिल्लू असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक पाडसाचा ताबा घेण्यासाठी सोरेगाव शिवारात वाहनासह दाखल झाला. त्यांना सोरेगाव परिसरातील शेतामध्ये शेळ्या-मेंढ्यांसोबतच एक हरणाचे पिल्लू चरताना दिसून आले. मेंढपाळाकडे चौकशी केली असता ते कर्नाटकातून आल्याचे सांगितले. 

वनविभागाच्या अधिकाºयांनी मेंढपाळाला वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७२ बाबत माहिती दिली. कोणत्याही वन्यजीवाला पाळणे हा अपराध असल्याचे सांगितले. वन्यजीवाला पाळल्यास त्याच्या नैसर्गिककरीत्या जगण्याच्या क्रियेमध्ये आणि निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये बाधा पोहोचत असल्याबाबत जागृत केले. वनविभागाच्या अधिकाºयांना सकारात्मक प्रतिसाद देऊन मेंढपाळाने पाडसाला वनविभागाच्या स्वाधीन केले. वनविभागाने पाडसाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या मोहिमेत वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे, वनरक्षक शुभांगी कोरे, वनरक्षक यशोदा आदलिंगे, वनरक्षक बापू भोई, वनरक्षक अनिता शिंदे, वाहनचालक कृष्णा निरवणे असे पथक होते. यासाठी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या पंकज चिंदरकर यांनीही मदत केली.

दूध पिणारे पाडस चरायलाही शिकलेमार्च महिन्यात कर्नाटकातून लातूर जिल्ह्यातील निलंग्यामध्ये आले असता माळरानावर त्यांना नुकतेच जन्मलेले हरणाचे पिल्लू दिसले. आजूबाजूला शोधले असता हरणाचा कळप किंवा त्याची आई दिसून आली नाही. माळावरचे मोकाट कुत्रे किंवा लांडगे त्याला मारतील म्हणून मेंढपाळाने त्याला आपल्या कळपाबरोबर घेतले. शेळीचे दूध पिऊन हे पिल्लू वाढले. तसेच आता ते गवत- पालादेखील चरायला शिकले होते. त्याला कधी बांधूनही ठेवले नाही. मोठे झाले की ते स्वत:हून निघून जाईल. तिथे सोडले तर कुत्रे त्याला भक्ष्य बनवतील, या भीतीने त्याला सोबत घेतल्याचे मेंढपाळाने सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर