सोलापूर : निवडणुकीचा खर्च वेळेवर न दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतच्या सरपंचासह इतर सहा सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल विरोधात संबंधित सरपंच व सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आयोगाकडे सुनावणी होऊन सरपंच आणि इतर सदस्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. या सर्वांचे सदस्यपद कायम ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. यात सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर, सदस्य स्मिता अशोक मुक्काणे, सोमनिंग धरेप्पा कमळे, संगप्पा काशीराम बिराजदार, युक्ता यतीन शहा, राजश्री उमेश जंगलगी (सर्व रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) यांचा समावेश आहे. या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांनी सहा जणांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता.