अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायातीत रूपांतर करावे यासाठी मंगळवारी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते गावचे उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, माजी उपसरपंच बाळासाहेब फुले आदी शिष्टमंडळाने भेट घेऊन याप्रकरणी विशेष लक्ष घालून लवकरात लवकर या तिन्ही गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याविषयी निवेदन दिले.
अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे या मागणीसाठी तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी २२ जूनपासून अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. ग्रामस्थांसह विविध व्यापारी संघटना, सार्वजनिक गणेश व नवरात्र मंडळे, सामाजिक संघटना दररोज या ठिकाणी येऊन साखळी उपोषण करीत आहेत.
----
फोटो
अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. छायाचित्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील आदी.
200721\img-20210720-wa0042.jpg
मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेवुन निवेदन देण्यात आले.