शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

शेतकºयांना दिलासा; शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:21 PM

सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला  प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा ...

ठळक मुद्देमाळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या दीड किलोमीटरचे काम आता बंद पाईपलाईनचे होणारवनपरिक्षेत्र कार्यालयाने काम अडविल्याने २०१३ पासून थांबलेले काम सुरू८ व ९ मध्ये बंद पाईललाईनचे सुमारे दीड किलोमीटर इतके काम होणार

सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला  प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ झाला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील क्षेत्राला उपयोगी ठरणाºया शिरापूर उपसा सिंचन योजनेला नव्याने प्रशासकीय मान्यता नसल्याने दोन वर्षे काम ठप्प झाले होते. त्यातच नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या  कालव्याचे काम करण्यास वनपरिक्षेत्र कार्यालयाने मज्जाव केला होता. वनपरिक्षेत्र कार्यालयाने काम अडविल्याने २०१३ पासून थांबलेले काम गुरुवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सुरू झाले.

शिरापूर उपसा सिंचनच्या उजव्या कालव्याचे किलोमीटर ८ व ९ मध्ये बंद पाईललाईनचे सुमारे दीड किलोमीटर इतके काम होणार आहे. यासाठी साधारण १० कोटींचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, सहायक अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, अभियंता भाऊसाहेब पाटील, ठेकेदार नानासाहेब शेळके, बाळासाहेब दबडे, बाळासाहेब पाटील, भारत बोंगे, अनिल भोसले, गोपाळ गवळी, प्रकाश गवळी,नंदू गवळी, लहू मुळे, प्रफुल्ल पाटील आदीसह गावकरी उपस्थित होते.

आता संपूर्ण काम पाईपलाईनचेच..माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या दीड किलोमीटरचे काम आता बंद पाईपलाईनचे होणार असून आता उर्वरित सर्वच लहान-मोठ्या कालव्याची कामे ही बंद पाईपलाईनची होणार आहेत. उजव्या कालव्याचे उर्वरित १९ किलोमीटरपर्यंतचे काम तसेच रानमसले वितरिकेचे काम बंद पाईपलाईनचे होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीटंचाईSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय