गेल्यावर्षी या पुलावरून एक कार वाहून गेलेल्या कारमध्ये बाप-लेकासह ड्रायव्हरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या पुलासह जेऊर येथील भीमनगर, जेऊर कोंढेज रस्त्यावर असलेल्या पुलाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हा पूल प्रचंड धोकादायक बनला आहेत. परंतु याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.
या पुलावरून या परिसरातील सौंदे, वरकटणे,कोंढेज, व लव्हे पुलावरून निंभोरे, मलवडी, केम घोटी या परिसरातील नागरिक ये-जा करतात. तसेच चिखलठाण ते सालसे मार्गे जाणारी एसटी देखील याच धोकादायक पुलावरून धावते. या दोन्ही पुलांची दुरुस्ती व रस्त्याच्या साईडपट्टी भरण्याची कामे त्वरित पूर्ण करावी अन्यथा युवा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी दिला आहे .
----
आणखी जीव गेल्यावर होणार काय दुरुस्ती
साईड गार्ड, बसवने, वाहून गेलेल्या जागेवर भराव टाकणे अशी कामे तत्काळ होणे अपेक्षित होते मात्र तीन जणांचा जीव जाऊन देखील प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. आणखी जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे काय असा सवाल फरतडे यांनी केला आहे.
---
फोटो : २५ करमाळा
ओळी : कोंढेज-लव्हे रस्त्यावरील धोकादायक पूल अपघातास निमंत्रण देत आहे.