शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

सोलापूरमध्ये विजेचे अपघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी WhatsApp वर कळवा; २४ तासात होईल दुरूस्ती

By appasaheb.patil | Published: July 19, 2023 3:25 PM

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात.

सोलापूर : उघड्या फ्यूज पेट्या, दरवाजे, तुटलेल्या तारा इत्यादींची व्हाट्सॲपवर नागरिकांकडून महावितरणला माहिती मिळाल्यावर त्वरीत दुरुस्ती करून होणारे अपघात टाळता यावे यासाठी मंडळ स्तरावर व्हाट्सएप नंबर सुरू करण्यात आले असून ग्राहकांनी त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पावसाळ्यात पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. तारा तुटणे, तारांना झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी व इतर कारणांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणाला व्हाट्सॲप किंवा एसएमएस द्वारे माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांना व्हाट्सॲप नंबरवर फोन करून तत्काळ माहिती देता येईल. 

हा आहे सोलापूरसाठी व्हॉटसअप नंबर

- पुणे परिमंडळ अंतर्गत रास्तापेठ मंडळ, गणेशखिंड मंडळ व पुणे ग्रामीण मंडळ यासाठी व्हाट्सॲप नंबर 7875767123 

- कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर मंडळासाठी 7875769103

- सांगली मंडळ यासाठी 7875769449 तसेच

- बारामती परिमंडळ अंतर्गत बारामती मंडळ यासाठी 7875768074

- सोलापूर करिता 9029140455 

-  सातारा मंडळासाठी 9029168554

व्हाॅट्सअप नसल्यास एसएमएस करा..

ज्या नागरिकांकडे व्हाॅट्सअप नाहीत त्यांनी 'एसएमएस'द्वारे तक्रार केल्यास त्याचेही निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी समन्वयक म्हणून मंडळ कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) व विभागीय कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप