सोलापूर : मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी लगलीच राजीनामा देईन पण माज्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. उलट आपल्या विचारांचे लोक जिथे आहेत, त्यांच्याशी या पदावर राहून संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने त्यांच्याशी या पदाच्या माध्यमातून आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करेन असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीन आसूड ओढो आंदोलन करण्यात आल त्यावेळी सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनकर्ते आल्यावर ते मंत्र्याच्या घरातून बाहेर पडत आंदोलनात सहभागी झाले.
पवार म्हणाले की माज्याकडे पाहताना भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून एकाच अँगलने पाहणे चुकीचे आहे. मी मराठा मोर्चा आंदोलनात पहिल्या दिवसांपासून हिरारीने सहभाग घेतला आहे. मात्र तरी देखील माझ्या गाडीवर दगड मारण्यात आला. त्यामुळे माझ्या घरातील लहानमुली आजही दहशतीखाली आहेत. आपल्या आंदोलनातून महिला व स्त्रीयांमध्ये भिती पसरेल व त्यांना त्रास होईल असे आंदोलन होणार असेल तर मी आंदोलनात येणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी असे हिंसक कृत्य करु नये.
पवारांच्या गाडीला दगड मारणाºया मराठा कार्यकर्त्यांचा निषेधसहकार मंत्र्यांच्या घरासमोर आसूड मारो आंदोलन करत असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात हाय हायच्या घोषणा देत असताना शहाजी पवार यांनी त्यांच्या गाडीवर झालेली दगडफेक अन पूर्वीच्या सत्ताधाºयांनी न दिलेला रोजगार यावर भावनिक भाषण केले. त्यानंतर शहाजी पवार यांच्या गाडीवर दगड मारलेल्या प्रवृत्तीचाही निषेध करण्यात आला व सभा संपविण्यात आली.