सभापती रजनी भडकुंबे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा मंगळवारी झाली. सध्या वाळू मिळत नाही. मिळाली तर त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. घरकुलासाठी लागणाऱ्या वाळूसाठीच मिळणाऱ्या अनुदानातील ५० टक्के पर्यंत रक्कम द्यावी लागते. सिमेंट व मजुरीचे दरही वाढल्याने मिळणारे एक लाख १५ हजार रुपये अनुदान फारच तोकडे पडत आहे. त्यामुळे रमाई, प्रधानमंत्री, पारधी, शबरी व इतर घरासाठीचे अनुदान तीन लाख रुपये करण्याचा ठराव करण्यात आल्याचे सभापती रजनी भडकुंबे यांनी सांगितले.
---
वाळू मिळत नाही
यावर्षी उद्दिष्ट नाही
मागील वर्षी कोरोनामुळे रमाई योजनेतून तालुक्यात एकही नवीन घरकुल मंजूर झाले नाही. रमाई व प्रधानमंत्री योजनेतून काही निवडक गावात मंजूर झालेल्या घरांची कामे सुरू आहेत. मात्र त्यासाठी वाळू मिळत नाही.
---