आजपर्यंत तालुक्यात दहा हजार लोकांनी लस घेतलेली आहेत.
सुरुवातीच्या कालावधीत लस घेण्यासाठी अल्पप्रतिसाद मिळत होता. यामुळे लसीचा तुटवडा भासत नव्हता, मात्र चार दिवसांपासून तालुक्यात लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या, अशातच वरिष्ठ कार्यालयाकडून वेळेवर लस उपलब्ध झाल्या नाहीत.
केवळ ८० लसच शिल्लक
सध्या अक्कलकोट शहरात ग्रामीण रुग्णालय येथे एकमेव केंद्र आहे. आणखीन काही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात आठ प्राथमिक केंद्र व उपकेंद्र १५ असे २३ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. यामुळे ग्रामीण जनतेची सोय झाली आहे. गुरुवारी १६० लस तालुक्यासाठी शिल्लक होती. त्यापैकी ८० लस वापरण्यात आली असून, ८० शिल्लक आहेत.
कोट :::::::::
अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात २३, तर शहरी भागात एक असे २४ ठिकाणी कोरोनाविरोधी लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून सोय केली आहे. सध्या एक दिवस पुरेल इतकी लस शिल्लक आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली असून, लवकरच मिळतील. लस कोटा संपल्याशिवाय देण्यात येत नाही. संपल्याबरोबर मिळत असते. नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.
- डॉ. अश्विन करजखेडे,
तालुका आरोग्य अधिकारी
कोट ::::::: अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात रोज लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी होत आहे. याठिकाणी शहराजवळील ग्रामीण भागातूनही लोक येतात. तरी आरोग्य विभागाने आणखीन केंद्र निर्माण करण्याची गरज आहे.
- सचिन स्वामी,
अक्कलकोट