मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व आरोग्य रक्षणासाठी घेत असलेल्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे काम या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. तसेच शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देणे, लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख महावीर देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, उपतालुका प्रमुख प्रवीण शिंदे, विभाग प्रमुख महेश इंगोले, शाखाप्रमुख पोपट इंगोले, ग्रा.पं. सदस्य रणजीत जाधव, विजय लिंगे, संजय मोहिते, दत्तात्रय लिंगे, जयसिंग पवार, मनोज कलढोणे, अजित राऊत, सचिन शेरकर, महादेव पवार, भैया पटेल आदी उपस्थित होते.