त्याशिवाय बावकरवाडी येथेदेखील ग्रामस्थांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये १० जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना लक्षणे दिसल्यास तातडीने टेस्ट करून घ्यावी आणि बरे व्हावे, असे आवाहन सरपंच उमेश पाटील यांनी केले आहे.
या कामात चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा सेविका, सरपंच उमेश पाटील, बसवराज बाणेगाव, सिद्धाराम भंडारकवठे, महेश पाटील, गणेश कोळी, महिबूब तांबोळी, परमेश्वर वाले, विलास कांबळे, श्रावण गजधाने, सुरेश सुरवसे, ज्ञानेश्वर कदम, सिद्धाराम भंगे, सिद्धाराम पाटील, कुमार दुलंगे, विजय कोरे, प्रकाश बुगडे, प्रशांत सुभाष पाटील यांचे मोठे योगदान मिळत आहे.
----
फोटो १५ चपळगाव
ओळ : चपळगाव येथे सरपंच उमेश पाटील यांनी स्वतः कोरोनाची चाचणी करीत शिबिराचा प्रारंभ केला. याप्रसंगी सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ व इतर.
----
===Photopath===
150521\2012img-20210515-wa0019.jpg
===Caption===
चपळगाव येथे सरपंच उमेश पाटील यांनी स्वतः कोरोनाची चाचणी करत शिबीराचा शुभारंभ केला.