आप्पासाहेब पाटील
सोलापूर : निसर्गाने सोलापूरवर मुक्तपणे उधळण केली आहे़ हिरवीगार शेती आणि नैसर्गिक वनसंपदा यामुळे सोलापुरात माळढोक (दि ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्यांचे वास्तव्य आहे़ जगातील दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन नान्नज येथे घडत असल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक माळढोक अभयारण्यास भेटी देण्यासाठी इथं येतात़ पर्यटन वाढीसाठी अभयारण्य विभागाच्या अधिकाºयांनी पक्षी निरीक्षणासाठी आलेल्यांना मुक्कामी राहण्याच्या सोयीबरोबर खाण्या-पिण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती माळढोक अभयारण्याचे कल्याणराव साबळे यांनी दिली.
सोलापूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि येथील पर्यटनस्थळे यांचा मेळ घालून काम करीत असल्यामुळे सोलापूर हे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ लागले आहे़ पर्यटन वाढीसाठी माळढोक अभयारण्य विभागाने विविध सेवासुविधा निर्माण केल्या आहेत़ जुलै ते डिसेंबर या कालावधीत याठिकाणी भेटी देणाºयांची संख्या जास्त आहे, असे माळढोक अभयारण्यातील अधिकाºयांनी सांगितले़ याशिवाय माळढोक व अन्य पक्ष्यांविषयी लहान मुलांना कुतूहल निर्माण व्हावे, यासाठी खेळणी, बागबगिचांची निर्मिती केली आहे़ याशिवाय पर्यटकांना पक्षी निरीक्षण करता यावे, यासाठी उंच झोपडी, विविध लेन्स व चांगल्या प्रतीच्या कॅमेºयांची उपलब्धतता करून दिली आहे़ पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या निरीक्षकांना मुक्कामी राहण्यासह खाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या सेवासुविधांमुळे मागील सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयांच्या सहलींच्या संख्येत वाढ झालेली आहे़
माळढोक अभयारण्याविषयी थोडंसं...भारतीय उपखंडात माळढोक हा पक्षी दुर्मिळ आहे़ या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा उडताना विमानासारखा उडतो़ म्हणजे आधी धावत जाऊन मग आकाशात भरारी मारतो़ आकाशातून खाली उतरल्यानंतर तो थोडा चालून मग थांबतो़ माळढोक हा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यात दिसतो़ उत्तर सोलापूर, माढा, मोहोळ, करमाळा या सोलापूर जिल्ह्याच्या भागात अभयारण्य पसरलेलं असून, त्याचं एकूण क्षेत्र ८४९६़४४ चौ़ कि.मी. इतकं होतं़ माळढोक पक्ष्याचा समावेश वन्यजीव कायदा १९७२ च्या शेड्यूल-१ मध्ये समाविष्ट केले आहे व आवश्यक ते संरक्षण दिलेले आहे.