सोलापूर : येथील युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर असोसिएशन, सोलापूर कापड उत्पादक संघ आणि महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या युनिफॉर्म प्रदर्शनाला खूप मोठा प्रतिसाद लाभला़ या प्रदर्शनामुळे देशातील अव्वल दहा कापड कंपन्यांनी सोलापुरात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शविली आहे. तसेच ९ लाख रुपयांच्या गणवेशाची मागणीही झाली आहे.
याबाबत करार झाला असून, येथील कंपनीला दर महिना १५ हजार गणवेश बनवून पुरवावे लागणार असल्याची माहिती युनिफ ॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष नीलेश शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे सहकार आणि वस्त्रोद्योगमंत्रीसुभाष देशमुख आणि राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे यांच्या सहकार्यातून बंगळुरूमध्ये ८, ९ आणि १० जानेवारी असे तीन दिवस हे युनिफॉर्म प्रदर्शन भरले होते़ हे प्रदर्शन सोलापूरच्या विकासाला टर्निंग पॉर्इंट ठरले आहे़ या प्रदर्शनात सोलापूरमधून एकूण १०२ व्यापाºयांनी सहभाग नोंदविला़ या प्रदर्शनामुळे येत्या दोन वर्षात किमान ३ हजार जणांना रोजगार मिळणार आहे़ सोलापूरचे युुनिफॉर्म गारमेंट परदेशात पोहोचण्यास आणखी गती मिळणार आहे़ असा प्रयोगही देशात प्रथमच झाला आहे़ या प्रदर्शनाच्या माध्यमातून कामगारांचे कौशल्य वाढविण्यासाठी सिम्बॉयसिस विद्यापीठ, पुणे यांच्यासोबत प्राथमिक बोलणी झाली आहे.
या पत्रकार परिषदेस सहकारमंत्री सुभाष देशमुख, युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनचे सतीश पवार, प्रकाश पवार, जितेंद्र डाकलिया, रोहन बंकापुरे आणि संतोष उदगिरी उपस्थित होते.
आगामी काळात दिल्लीत ब्रँडिंग - बंगळुरू येथील प्रदर्शनानंतर सोलापूरमधील व्यापाºयात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे़ आगामी काळात ३० देशात सोलापूरच्या गणवेशाचे ब्रँडिंग केले जाणार आहे़ राजधानी दिल्लीत मार्के टिंग, ब्रँडिंग करणाऱ सोलापूरमधील कामगारांना कुशल करण्यासाठी प्रतिमहिना ३०० कामगारांना सीएसआर फंडातून प्रशिक्षण दिले जाणार आहे़