सोलापूर : महापालिकेच्या अनेक ठेकेदारांची बिले थकीत असल्याने पाणीपुरवठ्याच्या मेन्टेनन्सचे काम घेण्यास कोणीही ठेकेदार तयार नाही. पाच वेळा टेंडर काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी व टाकळी जलवाहिनीवरील गळती, शहरांतर्गत दुरूस्त्यांचा वार्षिक ठेका दरवर्षी दिला जातो. यासाठी अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद आहे. पाणीपुरवठा विभागाने वार्षिक मेन्टेनन्सचे टेंडर पाच वेळा काढले. पण काम घेण्यास कोणीही ठेकेदार पुढे आलेला नाही. त्यामुळे जलवाहिनीची मेन्टेनन्सची कामे खोळंबली जात आहेत. महापालिकेच्या अनेक विकासकामांची बिले थकीत आहेत. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्ते व इतर विकासाची कामे केली गेली. या कामांचे बिल न मिळाल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे नव्याने काम घेण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही.
वास्तविक पाणी पुरवठ्याच्या कामाची बिले लवकर दिली जातात. पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने दैनंदिन अडचणीवेळी कामे अडून राहणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाणी पुरवठ्याची कामे करणाºया ठेकेदारांना प्राधान्यक्रमाने बिलाचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही पाणी पुरवठ्याची कामे करण्यास ठेकेदारांनी तयारी दर्शविलेली नाही.
या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने मेन्टेनन्सच्या कामाचे दरपत्रक मागविले आहेत. सोनी, सगर व जोशी या ठेकेदारांनी दरपत्रक पाठविले आहेत. पण कामाचे दर जवळपास सारखेच असल्याने यातून निवड कशी करायची हा पेच अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे स्पर्धात्मक दर ठरविण्यावर भर देण्यात आला आहे.
औज बंधाºयासाठी पाणी सोडा- उजनी जलवाहिनीवर दोन दिवसांसाठी शटडाऊन घेतल्याने टाकळी व हिप्परगा योजनेतून शहराचा पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ५ आॅगस्ट उजाडणार आहे. तर इकडे औज बंधारा शून्यावर आहे. या बंधाºयातील सर्व पाणी चिंचपूर बंधाºयात घेण्यात आले आहे. चिंचपूर बंधाºयाची पाणीपातळी २.५५ मीटर आहे. हे पाणी १२ आॅगस्टपर्यंत पुरणार आहे. आषाढीसाठी उजनीतून ४ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले, पण हे पाणी औज बंधाºयापर्यंत येण्याची शाश्वती दिसत नाही. त्यामुळे ५ आॅगस्टला औज बंधाºयासाठी उजनीतून पाणी सोडावे लागणार आहे. औज बंधाºयातील पाणी स्थितीबाबत जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. पाणी सोडण्याबाबत पुन्हा पत्र देण्यात येणार आहे.