शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर चर्चा होतेय कर्तव्याचीच म्हणतात, आजही निष्ठा ‘सद्रक्षणाय..’च्या ब्रीदवाक्याशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 2:43 PM

सेवेतील आठवणींना मिळतो उजाळा; कर्मचाºयांबरोबर रिटायर्ड अधिकारीही येतात एकत्र

ठळक मुद्दे पोलीस खात्यात काम करून सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस अधीक्षकापर्यंतच्या अधिकाºयांचा समावेश एखाद्या पोलीस कर्मचाºयावर जर अन्याय झाला असेल तर त्याची सखोल माहिती घेतातबहुतांश गुन्ह्याच्या तपासात ही मंडळी सध्याच्या पोलिसांना मदत व मार्गदर्शन करीत आहेत

संताजी शिंदे 

सोलापूर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयुष्यभर जनतेच्या सेवेसाठी काम केलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी वयाची सत्तरी ओलांडली तरी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, आम्ही आजही तयार असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर बसलेली मंडळी एकत्र येऊन शेवटपर्यंत जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य अशी चर्चा करतात. 

शहर पोलीस आयुक्तालय स्थापने पूर्वीपासून कामावर असलेले आणि गेल्या ५ ते १० वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या माजी पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचा कट्टा भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आहे. अशोक चौक पोलीस चौकीच्या बाजूला व शहर पोलीस मुख्यालयासमोरील कट्ट्यावर ही मंडळी दररोज सकाळी व संध्याकाळी जमतात. ५० पेक्षा जास्त सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी एकत्र येतात. शहराच्या गुन्हेगारीवर चर्चा करतात, आपले अनुभव सांगून गुन्ह्याचा तपास कसा झाला पाहिजे यावर आपले मत सांगतात. आपल्यासोबत काम केलेल्या व सध्या कर्तव्यावर असलेल्या सहकाºयाला मार्गदर्शन करतात. 

सेवानिवृत्तीनंतर सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, नातवांना शाळेत सोडणे, घरचा भाजीपाला आणून देणे, सकाळी ९ ते १० दरम्यान कट्ट्यावर येऊन सहकारी मित्रांसमवेत गप्पा मारणे. दुपारी घरी जाणे आराम करणे, राहिलेली कामे करणे आणि पुन्हा सहकाºयांसोबत वेळ घालवणे अशी दिनचर्या असलेल्या मंडळींमधला पोलीस आजही जागृत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सेवानिवृत्त कर्मचाºयांना बोलावून, वाहतूक शाखेच्या पोलिसांना मार्गदर्शन करण्यास सांगितले होते. बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाºयांनी आपले कर्तव्य समजून तत्काळ होकार दिला होता. 

कॉन्स्टेबलपासून एस.पी.पर्यंतचा समावेश- पोलीस खात्यात काम करून सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस अधीक्षकापर्यंतच्या अधिकाºयांचा समावेश आहे. ही मंडळी दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. एखाद्या पोलीस कर्मचाºयावर जर अन्याय झाला असेल तर त्याची सखोल माहिती घेतात. झालेला अन्याय खरा असेल तर त्याच्या बाजूने उभे राहतात, पोलीस आयुक्तांपासून गृहमंत्र्यांपर्यंत जाऊन संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. १२ ते १८ घंटे काम करून कर्तव्य पार पाडलेली ही मंडळी आज निवांत असली तरी त्यांच्यातील पोलीस मात्र अद्याप जागृत आहेत. बहुतांश गुन्ह्याच्या तपासात ही मंडळी सध्याच्या पोलिसांना मदत व मार्गदर्शन करीत आहेत. 

पोलिसांचा आदर कमी होतोय : किसनराव उबाळे- आम्ही सेवेत असताना पोलिसांचा एक मोठा दबदबा होता. आज राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगार आपण काही केलं तरी लगेच बाहेर येतो, अशा मानसिकतेमध्ये आहेत. शहरातील गल्लीबोळात थिल्लरपणा वाढला आहे, किरकोळ गोष्टींवरून मोठे गुन्हे होत आहेत. शांतता कमिटीमध्ये असणारे काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. सध्या कर्मचारी देखील कारवाई करण्यास घाबरत आहेत, कायद्याचा हिसका दाखवला की निलंबनाची तयारी ठेवावी लागते. पोलिसांबद्दल असलेली आदरयुक्त भीती सध्या कमी झाली आहे, अशी खंत सेवानिवृत्त फौजदार किसनराव उबाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस