शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या विभाजनात महसूलची ‘मनमानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:25 PM

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देएका मंडलात १६ हजार तर दुसºया मंडलात ३२ हजार लोकसंख्या असा विरोधाभास प्रशासनाने १० गावात दोन मंडले करताना बेलाटीला तुळजापूर रोडलगतची कामे जोडण्याची किमया केलीसध्या उत्तर तहसीलच्या अखत्यारित सोलापूर, शेळगी, तिºहे, मार्डी व वडाळा हे मंडल आहेत तहसील कार्यालयाने उत्तर तहसील विभाजनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर

अरुण बारसकर सोलापूर दि २१ : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे. पुनर्रचनेत हाकेच्या अंतरावरील तिºहे व बेलाटीला स्वतंत्र मंडले सुचविली आहेत. एका मंडलात १६ हजार तर दुसºया मंडलात ३२ हजार लोकसंख्या असा विरोधाभास आहे.उत्तर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत शहराच्या हद्दवाढीत सामावलेल्या ११ गावांचाही समावेश आहे. शिवाय शहराच्या काही भागांचाही समावेश असल्याने उत्तर तालुका तहसील कार्यालय ग्रामीण भागासाठी स्वतंत्र करण्याची मागणी आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाने उत्तर तहसील विभाजनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. नव्याने रचना करताना शहरासाठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती सुचवली असून ४० गावांसाठी स्वतंत्र तहसील कार्यालयाचा आराखडाही तयार केला आहे. मात्र अपर तहसीलदार हे तहसीलदारांच्या अखत्यारितच राहणार असल्याचे सांगण्यात आले. पुनर्रचना करताना २०११ ची जनगणना विचारात घेतली आहे. --------------------अपर तहसीलदारांचे कार्यक्षेत्र- सध्या उत्तर तहसीलच्या अखत्यारित सोलापूर, शेळगी, तिºहे, मार्डी व वडाळा हे मंडल आहेत. - नव्या रचनेत अपर तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात सोलापूर, शेळगी व मंडल अधिकारी सिटी सर्व्हे हे तीन मंडल राहणार आहेत.- सोलापूर मंडलामध्ये मजरेवाडी, कसबे सोलापूर, नेहरूनगर, सलगरवाडी, बाळे, केगाव व शिवाजीनगर- शेळगी मंडलामध्ये शेळगी, दहिटणे, सोरेगाव, प्रतापनगर, कुमठे, देगाव व बसवेश्वरनगर ---------------------नवे ‘बेलाटी’ मंडल केले प्रस्तावितमहसूल खात्याने जुन्या तिºहे, वडाळा व मार्डी शिवाय नव्याने बेलाटी मंडल प्रस्तावित केले आहे. वडाळा मंडलात १० गावे, त्यांची लोकसंख्या ३१ हजार ४७८ इतकी तर मार्डी मंडलात ११ स्वतंत्र गावे व तरटगाव जोडले आहे. यामुळे मार्डी मंडलाची ३२ हजार इतकी लोकसंख्या झाली आहे. एकरुख मात्र बेलाटी मंडलाला जोडले आहे. बेलाटी मंडलात डोणगाव, नंदूर, कवठे, बेलाटी, हगलूर, हिप्परगा, एकरुख, खेड व कोंडीचा समावेश केला आहे. --------------------तर सोईचे झाले असते...दक्षिण तालुका मतदारसंघाला जोडलेल्या व सीना नदीकाठच्या १० गावांची लोकसंख्या २६ हजार २४५ इतकी असून या गावांचा एक मंडल प्रस्तावित करता आला असता. मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या २४ गावांची लोकसंख्या ७९ हजार ५४९ इतकी असून याचे तीन मंडलात विभाजन केले असते तर प्रत्येक मंडलात २६ हजार ५१६ इतकी लोकसंख्या होते. मात्र प्रशासनाने १० गावात दोन मंडले करताना बेलाटीला तुळजापूर रोडलगतची कामे जोडण्याची किमया केली आहे. ---------------------- सहा गावांचे तिºहे तर ३२ हजारांचे मार्डी मंडल- पुनर्रचनेत तिºहे मंडलात तिºहे, पाथरी, तेलगाव, हिरज, पाकणी व शिवणी ही गावे असून त्यांची लोकसंख्या १६ हजार ५३ इतकी होते.- बेलाटी मंडलातील बेलाटी, डोणगाव, नंदूर, कवठे, हगलूर, हिप्परगा, एकरुख, खेड व कोंडी या गावांची २५ हजार ३१७ (एकरुख वगळून) इतकी लोकसंख्या आहे.- वडाळा मंडलात वडाळा, गावडीदारफळ, रानमसले, नान्नज, वांगी, पडसाळी, कौठाळी, भागाईवाडी, कळमण व साखरेवाडी असून ३१ हजार ४७८ इतकी लोकसंख्या होते.- मार्डी मंडलात भोगाव, बाणेगाव, कारंबा, गुळवंची, मार्डी, नरोटेवाडी, सेवालालनगर, होनसळ, तरटगाव, राळेरास, अकोलेकाटी व बीबीदारफळच्या ३२ हजार ९२६ (एकरुखसह) लोकसंख्येचा समावेश आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय