शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

रिक्षांना ना मीटर, ना गणवेशाचा पत्ता; सोलापुरात कुठंही थांबून दादागिरीचा कित्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 11:01 AM

सर्वसामान्य वैतागले : रिक्षाचालक म्हणे आमचं कुणी ऐकूनच घेत नाही

सोलापूर : आरटीओ, परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा पत्ता, ना गणवेश, रस्त्यावर कुठंही थांबायचं, उलट दादागिरीची भाषा, यामुळं काही बोलायला वावच नाही, अशा शब्दांत सोलापूरकरांमधून रिक्षाचालकांबद्दल सूर उमटू लागला आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांनी आमचं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाही. नुसती कारवाईचीच भाषा केली जाते, अशी भावना व्यक्त केली.

सोलापुरात एकतर महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिटीबस सेवेचा फज्जा उडाला आहे. इनमिन २५ बस कशाबशा रस्त्यावर धावताहेत. जवळपास १० लाख लोकसंख्येच्या शहराला ही सेवा कशी पुरणार? दुचाकींची संख्या घरोघरी वाढलेली असली तरीही बहुतांश भार रिक्षांवर पडतो. सर्वसामान्य माणूस रिक्षातून प्रवास करीत असताना मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. विचारणा केली तर थातूरमातूर कारणे दिली जातात. गणवेशाचाही पत्ता नसतो. अधिक विचारणा केली तर उत्तरे व्यवस्थित मिळतात. अशावेळी आम्ही कोणाकडे दाद मागायची आणि मागायची म्हटलं तरी कुणाला वेळ आहे? असा सवाल श्रीकांत कुलकर्णी, विनायक स्वामी, सज्जन साळुंखे, ऋषिकेश अग्निहोत्री या प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला.

---

बसायचं तर बसा; अन्यथा...

  • उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांना जे दरपत्रक दिले आहे त्यानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही. मधल्या काळात अनेक रिक्षाचालकांना गणवेश दिसायचा, आता ते प्रमाणही कमी झाले आहे. मीटरप्रमाणे बिल देतो म्हटले तरी टाळाटाळ केली जाते. उलट
  • शेअर ए रिक्षाच्या नावाखाली अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. जरा कुठं विचारणा करायचा प्रयत्न केला तर ‘बसायचं तर बसा...’ असं सुनावलं जातं. याचा अनुभव आपण स्वत: घेतला असल्याचे संदीप सूर्यवंशी व विकास बंडगर या प्रवाशांनी ऐकवला.

----

रस्त्यावर कुठंही थांबा

- शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, गांधीनगर, विजापूर रोड, आसरा चौक, विमानतळ, पूर्व भाग परिसरात रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी कुठेही थांबतात. प्रवाशांना विचारणा करतात. पाठीमागून येणाऱ्या अन्य वाहनांचीही पर्वा केली जात नाही. हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.

----

तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त डॉ. दीपाली धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे. रिक्षाचालकांकडून सौजन्याची सेवा देण्यासाठी बैठकीद्वारे सूचना केल्या आहेत. त्यांच्या मते शहरातील २३९ थांब्यांशिवाय आणखी थांबे वाढवून मागणी होत आहे. यावर महापालिका व वाहतूक विभागामार्फत सर्व्हे करून आवश्यकता वाटल्यास त्यावर विचार करता येईल. मात्र, ठरावीक गणवेश, थांब्यावरच रिक्षा थांबवाव्यात, तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करता येणार नाही; अन्यथा कारवाई करण्यात येईल, सध्या धडक मोहीम सुरू असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी स्पष्ट केले.

----

रिक्षाचालक म्हणतात.. जरा आमचंही ऐका

वाढत्या महागाईमुळे आम्हाला प्रवासी वाहतूक परवडत नाही. दरवाढीवर विचार केला जात नाही. नुसते रिक्षाचालकांवरच कारवाईची भाषा होते. आमच्या समस्याही उपप्रादेशिक परिवहन विभागाने, परिवहन प्राधिकरणाचे प्रमुख आणि रिक्षा भाडे स्वस्त होण्यासाठी महापालिकेने पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सीएनजी गॅस कीट बसवण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी लालबावटा रिक्षा संघटनेचे सलीम मुल्ला यांनी रिक्षाचालकांच्या वतीने केली.

----

 

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस