वॉर्डामधील नागरिकांच्या गाठीभेटी, त्यांची आस्थेने विचारपूस, कामाबाबतच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी होत असलेली धावपळ, केलेल्या विकास कामांचे मांडणी, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून उमेदवार व गटनेते आपापल्या वॉर्डामध्ये विशिष्ट व स्वतःला पूरक वातावरण निर्माण करीत आहेत. मात्र यासाठी द्यावा लागणारा वेळ, खर्च होणारा पैसा या गोष्टी निवडणूक प्रक्रिया लांबल्यास सातत्य टिकवणे व याहून मतदारांचा सुरू असलेला विशिष्ट पद्धतीचा पाहुणचार जास्तकाळ परवडणारा नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेला निवडणुकीचा माहोल पुढील निवडणुकीपर्यंत टिकवण्यासाठी इच्छुकांची दमछाक होत आहे.
निवडणुकीचे तर्कवितर्क
जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचा टप्पा एकत्र होण्याची शक्यता होती. मात्र नव्याने स्थापन झालेल्या महाळुंग नगरपंचायतीमुळे ती निवडणूक या टप्प्यात होणार काय? कोरोना महामारीमुळे निवडणूक लांबणार काय? ग्रामपंचायती निवडणुका पार पडल्या, विधानसभा सुरू आहे, मग नगरपंचायतीला वेगळा न्याय का? नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार काय? असे अनेक तर्कवितर्क सध्या नगरपंचायतीच्या आनुषंगाने सुरू आहेत.
मतदारांचा पाहुणचार लांबणीवर
अलीकडील काळात निवडणुकीच्या परंपरा बदलत चालल्या आहेत. बहुतांश निवडणुकीत मतदार व कार्यकर्त्यांचा दररोज होणारा विशिष्ट पाहुणचार पद्धती रूढ झाली आहे. यात चहा-पाणी, वडापावसह जेवणावळी या गोष्टी
करणे इच्छुक उमेदवार व गटनेते यांना गरजेची गोष्ट ठरत आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे मतदारांचा पाहुणचार प्रक्रिया अद्याप गती घेताना दिसत नाही.