पहिले युवा सरपंच होण्याचा मान ऋतुराज यांना मिळाला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. टी. सुर्वे यांनी काम पाहिले. त्यांना मंगेश वाळके, एस. एस. कांबळे व ग्रामविकास अधिकारी टी. एल. मोहिते यांचे सहकार्य लाभले. सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कीर्ती बोधले, राधाबाई सावंत, धनश्री कोकाटे, अनुसया कुंभार, बजरंग गोसावी, माणकोजी भुसारे, भारत खंडागळे उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत, ॲड. केशव सावंत, संजय ढेरे, नाना शेलार, गणेश पवार, किरण कोकाटे, शाहू कोकाटे, अजिंक्य काटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कौतुक केले.
फोटो
२३वाकाव-ऋतुराज सावंत
२३वाकाव-प्रियांका कदम