ते पुढे म्हणाले की, महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही, असे सांगितले; तर दुसरीकडे महावितरण कंपनी सक्तीने वीज कनेक्शन तोडत आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल तत्काळ माफ झाले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफी देऊन त्यांचे कनेक्शन तोडणे तत्काळ थांबले पाहिजे. त्यांना हप्त्यात बिल भरण्याची सुविधा मिळाली पाहिजे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना १९ तारखेला राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करीत आहे.
यावेळी नरेंद्र पाटील, अमोल हिप्परगे, संतोष अंबड, रत्नशील जैनजांगडे, मनोज जाधव, सागर माने, मारुती माने, रुद्रमुनी स्वामी, विजय मठ, सिद्धाराम इमडे, खय्युम जमादार, अमोल गुरव, अविनाश कदरगे, वजीर जमादार, प्रकाश पाटील, सचिन खडके, बसवराज म्हेत्रे, गोपाळ कुंभार, आदी उपस्थित होते.
----