सापटणे येथील कुबेरवस्ती रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळले होते. या रस्त्यावरून अनेक वेळा दोन गटांत भांडण होऊन वाद न्यायालयापर्यंत गेला होता. समाजात दुही निर्माण झाली होती. या रस्त्यामुळे अनेकांची शेतीही पडीक राहिली. गावातील दोन गटांत असलेल्या टोकाच्या विरोधामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या रस्त्याचे काम कळीचा मुद्दा ठरला, तेव्हा स्वराज्यप्रणीत दादा मामा ग्रामविकास आघाडीच्या प्रमुखांनी या रस्त्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंधित दोन्ही गटांना एकत्र करून दोघांच्या सहमतीने या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या रस्ते कामाचा शुभारंभ तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती बंडूनाना ढवळे, पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद, मंडळ अधिकारी शेळवणे, भीमराव ढवळे, जनार्दन ढवळे, नागनाथ ढवळे, पांडुरंग ढवळे, बाजीराव ढवळे, संतोष जगताप, धनंजय कुबेर, रामचंद्र कुबेर, सरपंच दादासाहेब कुबेर, भाऊ जगताप, दत्तात्रय कुबेर, संजय शिंदे, पिंटू गायकवाड, रवी कुबेर, हनुमंत सुक्रे, जनार्दन सुक्रे, जनार्दन ढवळे, अमोल ढवळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सापटणे येथील उद्योगपती विठ्ठल ढवळे व स्वामी समर्थ संस्था हे या रस्त्याच्या कामाचा संपूर्ण खर्च करणार आहेत.
फोटो
१९सापटणे०१
ओळी
सापटणे येथील रखडलेल्या रस्ते कामाच्या शुभारंभप्रसंगी राजेश चव्हाण, बंडूनाना ढवळे व ग्रामस्थ.