अंकोली ते औंढी रस्ते कामाचे भूमिपूजन लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते झाले. या रस्त्यासाठी २५/१५ योजनेंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार माने म्हणाले, मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य, जलसंधारणाची अनेक विकासकामे सुरू आहेत. आता दर आठवड्यात शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी खातेफोड, वाटप व नोंद धरण्याची प्रशासकीय प्रक्रिया स्वत: तहसील कार्यालयात जाऊन पाठपुरावा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झेडपी सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य माउली चव्हाण, सरपंच संदीप पवार, अंगद भुसे, प्रशांत बचुटे, एकनाथ माळी, बाबासाहेब क्षीरसागर, सचिन पाटील, नागराज पाटील, केशव पडवळकर, रविराज पवार, नितीन डोके, संभाजी डोके, प्रकाश बचुटे, दत्तामामा मुळे, सुधाकर चव्हाण, सज्जन घाडगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
१२कुरुल-रोड
ओळी
अंकोली ते औंढी या रस्त्याचे भूमिपूजन करताना आ. यशवंत माने, बाळराजे पाटील, बाबासाहेब क्षीरसागर, सरपंच संदीप पवार, दत्ता मुळे आदी.