कोविडचे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन आणि इतर स्त्रोतांचा अभाव आहे. कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा कमी पडत असताना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. महाळुंग कोविड सेंटरने श्रीपूर रोटरी क्लबने दिलेल्या ऑक्सिजन मशीनचा योग्य वापर करून एका महिलेला जीवनदान दिले. खंडाळीतील एक महिला महाळुंग कोविड सेंटरमध्ये दाखल झाली होती. तिची ऑक्सिजन पातळी कमी होत होती. त्यावेळी खऱ्या अर्थाने ऑक्सिजन मशीनची गरज भासली. अशा अनेक कोविड रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम श्रीपूर रोटरी क्लबच्या ऑक्सिजन मशीनमुळे शक्य होत आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून रोटरी क्लब सामाजिक उपक्रम राबवत आहे.
रोटरी क्लबचे ऑक्सिजन मशीन ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:23 AM