कृष्णा वाघमारे, इरफान मुजावर, अंबादास धोत्रे या स्वीकृत नगरसेवकांनी २८ डिसेंबर २०२० रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शहरातील छोटे मोठे नेते आपल्याला स्वीकृत नगरसेवकपद मिळावे. यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन परिचारकांच्या वाड्यावर चकरा मारत होते. यामुळे नेमके कुणाला संधी द्यावी, असा पेच परिचारकांसमोर निर्माण झाला होता.
ऑक्टोंबर २०२१ मध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. आठ महिन्यांमध्ये दोन मोठ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परिचारकांनी लोकसंख्येने कमी प्रमाणात आसणाऱ्या विखुरलेल्या समाजास प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. व ज्या समाजातून एकमताने उमेदवाराचे नाव देण्यात आले. त्यांचा विचार प्राधान्याने करण्यात आला.
यामध्ये जगदीश जोजारे, शिवाजी अलंकार व विजय वरपे यांची निवड केली आहे. त्या तिघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यावेळी त्यांच्यासह नगरसेवक अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, विक्रम शिरसट उपस्थित होते. २० जानेवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकृत निवड होणार आहेत. निवड झाल्यानंतर त्या तिघांना ९ महिन्यांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.
फोटो :
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर जगदीश जोजारे, शिवाजी अलंकार, विजय वरपे व त्यांच्यासह नगरसेवक अनिल अभंगराव, विवेक परदेशी, गुरुदास अभ्यंकर, विक्रम शिरसट व अन्य.
---