शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

सोलापुरात पताक्यांचा रांगा, घरांवर झेंडे; चौका-चौकात पोस्टर, मंदिरं फुलांनी सजली

By काशिनाथ वाघमारे | Published: January 21, 2024 7:26 PM

अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आनंदी माहोल बनला आहे.

सोलापूर: अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आनंदी माहोल बनला आहे. बाजारपेठांमध्ये पताक्यांच्या रांगा लागल्या आहेत. घरांघरांवर झेंडे लावले गेले आहेत तर चौका-चौकात श्रीरामांचे पोस्टर लागले आहेत. तसेच शहरतील मंदिरं ही फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजली आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात टिळक चौकात श्रीरामांच्या मोठे उंच पोस्टर आणि बॅनर लागले आहेत. 

तसेच सरस्वती चौक, मुरारजी पेठ, भैय्या चौक, मेकॅनिक चौक, पार्क चौक येथेही मोठमोठे बॅनर लागलेले दिसले. मधला मारुती येथील हलवायाच्या दुकानांनी मिठाई खरेदीसाठी रविवारी रामभक्तांची दिवसभर गर्दी होती. तसेच याच चौकातील फुलविक्रेत्यांकडेही हार आणि गुलाब पाकळ्यांसाठीही रामभक्तांची गर्दी दिसून आली. आसरा चौकातील छत्रपती ग्रूपच्या वतीने सोमवारी माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या वतीने १ लाख लाडू वाटप केले जाणार असून एका मंगल कार्यालयात हे लाडू बनवण्याचे काम सुरू आहे.   श्रीराम मंदिरात रांगोळीतून साकारली ३५ फुटाची प्रतिकृतीपूर्वभागात श्रीराम मंदिरात गेल्या चार दिवसांपासून तयारी सुरू आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता रक्तदान शिबीराला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ५० दात्यांचे रक्तदान झाले. तसेच या मंदिरात २० बाय ३५ फूट आकारात श्रीरामांची प्रतिकृती आर्ट ऑफ सोलच्या मुलींनी एकत्रित येऊन साकारली. 

टॅग्स :Solapurसोलापूर