उकळणा-यांचा अंतरिम जामीन फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : डॉक्टर असल्याचे सांगत किडनी शस्त्रक्रिया करून देण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये उकळून फसवणूक करणारे दोघे प्रवीण चतुर्भुज सुतार (रा.बार्शी) आणि मित्र बिभीषण अजिनाथ सुतार (रा. प्रकाशनगर, मिरज) यांचा बार्शीचे न्यायधीश जे. ए. पठाण यांनी अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.
याबाबत बार्शी शहर पोलीसात दोघविरुद्ध किडनीग्रस्त मुलाचे वडील परमेशवर सुतार (रा. बावी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांनी तक्रार दिली होती. त्या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी फिर्यादीचा मेहुणा बिभीषण सुतार व दुसरा बोगस डॉक्टर प्रदीप सुतार यांना अटक केली. पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात उभे करीत पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला असता त्यावर सरकारी वकील प्रसाद कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद करताना आरोपींनी केलेल्या या गुन्ह्याच्या तपासकामी आरोपीची जामिनावर मुक्तता केल्यास पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. तपासात साक्षीदारावर दबाव येण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करत आरोपीचा अंतरिम जमीन मंजूर करण्याला विरोध दर्शविला. हा युक्तिवाद मानत न्यायालयाने मान्य करीत अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.