प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेची सुरुवात डिसेंबर २०१५ रोजी केली होती. या योजनेत पात्र लाभार्थ्याला स्वत:चे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे १ लाख व केंद्र सरकारचे १.५ लाख असे २.५ लाख रुपये मिळणार होते. या योजनेतील ५८ पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी त्यांच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार प्रत्येकी २ लाखांचे अनुदान वितरित केले होते. त्यामुळे आता बांधकाम पूर्ण करून नगरपरिषदेत रितसर वापर परवाना घेतला असल्याने त्यांना उर्वरित ५० हजारांचे अनुदान वितरित केले. नवीन बांधकाम सुरू केलेल्या ५ लाभार्थ्यांना १ लाख अनुदान वितरित केले आहे.
१५४ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ सविस्तर प्रकल्प अहवालास शासनाकडून मंजुरी मिळालेल्या ४२३ पैकी १५४ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे तर ५८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक कक्ष तज्ज्ञ अमित कोरे कार्यरत आहेत.
घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलेल्या परंतु अंतिम हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर नगरपरिषदेत कागदपत्रांची पूर्तता करून वापर परवाना घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
कोट :::::::::::::::::
मागील २ वर्षांत घरकुल पूर्ण केलेल्या ५८ कुटुंबांना शेवटचा हप्ता वितरीत केल्याने त्यांच्या स्वप्नातील घर साकार झाले. अद्याप घर बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकामास सुरुवात करून या योजनेचा लाभ घ्यावा.
- राणी माने,
नगराध्यक्षा
कोट ::::::::::::::::::
प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःच्या हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी या योजनेचा गोरगरिबांना फायदा होत आहे. शिल्लक पैशांतून बांधकामास सुरुवात केल्याने नगरपरिषदेकडून वेळोवेळी अनुदान मिळत गेले. त्यामुळे आज मी माझ्या हक्काच्या घरात आनंदाने राहत आहे.
-
महादेव शिंदे
लाभार्थी, सांगोला