सोलापूर : सोलापुरात चोरट्या मार्गाने डंपर, टेम्पोतून येणाºया चोरट्या वाळूच्या तपासणीसाठी आरटीओच्या पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन आरटीओ व पोलिसांना वाळू चोरीवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे शहराकडे चोरटी वाळू आणणाºया वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सोलापुरात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढामार्गे वाळू आणली जात आहे.
अक्कलकोट तालुक्यात वारंवार कारवाई करूनही वाळू तस्कर प्रशासनाला गुंगारा देत वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले आहे. यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वारंवार कारवाई केली. तरीही वेळ बदलून बोटीतून वाळूचा अवैध उपसा करण्याचे काम सुरूच आहे. येथून वाळू वाहतूक करणारी वाहने अक्कलकोट, वळसंग, मंद्रुपमार्गे सोलापूर व उस्मानाबादकडे जात आहेत. वळसंग व मंद्रुप पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध नाकेबंदी सुरू केली आहे. तरीही सीना नदीतून वाळू उपसा करून टेम्पोद्वारे शहरात आणली जात आहे.
डंपर व टेम्पोतून होणाºया वाळूच्या तस्करीविरुद्ध आरटीओचे पथक कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा येथून येणाºया डंपरकडे वाळू उपशाच्या अधिकृत पावत्या असतात. पण अशा वाळू उपशातून तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू डंपरमध्ये भरता येत नाही. तरीही नियम डावलून वाळूची वाहतूक होत असताना दिसून आले तर ओव्हरलोडची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर जड वाहतूक बंदीच्या काळात शहरात वाळूची वाहने येत असताना दिसून आली आहेत. याबाबतही कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या असल्याचे खरमाटे यांनी सांगितले. डंपरचालकांनी तपासणी वेळेस सर्व कागदपत्रे हजर करणे आवश्यक आहे.
पोलीस कारवाईतील वाहने मोकाटच्पोलीस अधीक्षक पथकाने वाळू उपशावेळी केलेल्या कारवाईतील वाहनांची यादी आरटीओ कार्यालयाकडे पाठविल्यावर अशा वाहनांची नोंदणी काही कालावधीकरिता निलंबित करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण प्रांताधिकाºयांनी अक्कलकोट व शहरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या वाहनांची यादी आरटीओ कार्यालयाकडे आलेली नाही. या कारवाईतील वाहने पुन्हा वाळू वाहतुकीसाठी वापरात येत असल्याची माहिती आहे. आरटीओचे पथक नंबरप्लेट नसलेले व रंगविलेले डंपर जप्त करणार आहे.
११२ रिक्षांवर कारवाईच्त्याचबरोबर आरटीओ कार्यालयाने ६ ते २२ मे या काळात पंढरपूर, मोहोळ, बार्शी येथे रिक्षा तपासी मोहीम राबविली. यात परजिल्ह्यात नोंदणी असलेल्या व परमीट नसलेल्या ११२ रिक्षा जप्त करण्यात आल्याचे खरमाटे यांनी सांगितले. खासगी नोंदणी करून प्रवासी वाहतूक करणाºया या रिक्षा आहेत.या रिक्षांची नोंदणी १२0 दिवसांसाठी निलंबित करण्यात आली आहे.