आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : राजकुमार सारोळेसोलापूर : केंद्र शासनाने मंत्र्याच्या गाड्यावरील लाल दिवा बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत भारत सरकारतर्फे अद्यादेश जारी करण्यात आला असून, यापुढे फक्त पोलीस, अग्निशमन व आर्मी संबंधीत वाहनांना दिवे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यक्तींना दिवा लावण्यास अनुमती देण्याबाबत राज्य सरकाराला अधिकार दिले असून, या व्यक्तींची यादी अद्याप राज्य शासनातर्फे घोषीत झालेली नाही. केंद्र सरकारने १ मे रोजी जारी केलेल्या राजपत्रात केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १0८ (४) नुसार विशीष्ठ व्यक्तींच्या वाहनांवर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा दिवा लावण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अग्निशामक दलात कार्यरत असणारे अधिकारी, रक्षा अथवा अर्थ सैनिक बलात कायदा व व सुव्यवस्थे काम करणाऱ्यांसाठी दिवा लावता येईल. असा दिवा असणारे अधिकारी व कर्मचारी ज्यावेळी कर्तव्यावर नसतील त्यावेळी त्यांना दिवा चालू ठेवता येणार नाही. याशिवाय ज्या त्या राज्य सरकारने गरजेच्या व्यक्तीं किंवा अधिकाऱ्यासाठी दिव्याबाबत निर्णय घ्यावा व दरवषीं ही माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करावी लागेल. राज्य सरकार शिफारस करेल अशा व्यक्तींसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्टिकर उपलब्ध केले जातील.त्यात राज्य व संघ सरकारचे नाव, अधिकाऱ्याचे नाव व पद, वाहन क्रमांक नमूद केलेला असेल. एका अधिकारी व पदाधिकाऱ्यासाठी फक्त एकच स्टिकर दिले जाईल. पण यामध्ये कोणाचा समावेश असेल व पद्धत कशी असेल याबाबत महाराष्ट्र शासनाने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत राज्य शासन लवकरच स्वतंत्र अद्यादेश काढेल असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारनेलाल दिव्याबाबत राजपत्रात जारी केलेला अद्यादेश आरटीओ कार्यालयांना प्राप्त झाला आहे व त्याच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.
गाडीवर दिवा असणाऱ्यांना आरटीओ देणार स्टिकर
By admin | Published: May 02, 2017 12:22 PM