यावेळी झेडपी सदस्य रणजित शिंदे यांनी प्रशासनाकडे औषध साठ्याची कमतरता असल्यास विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत कोविड औषधोपचाराचे कीट उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, प्रणव परिचारक, पं. स. माजी सदस्य दिनकर नाईकनवरे, विठ्ठलचे माजी संचालक नंदकुमार पाटील, सरपंच गणपत उपासे, गणेश पिंजारी, माजी उपसरपंच ॲड. पांडुरंग नाईकनवरे, ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे, ग्रा. पं. सदस्य विष्णू मोरे, हरिदास पाटील, रमेश तवटे, दीपक नाईकनवरे, शिवाजी नाईकनवरे, सागर नाईकनवरे, संतोष नाईकनवरे, नागेश उपासे यांच्यासह आशासेविका, कोरोना ग्राम समितीमधील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो लाइन ::::::::::::::::
पटवर्धन कुरोली येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले, रणजितसिंह शिंदे, प्रणव परिचारक, रविकिरण घोडके, नंदकुमार पाटील आदी.