सांगोला ग्रामीण रुग्णालयाकडे असणारी १०२ रुग्णवाहिक देखभालीअभावी नादुरुस्त झाल्याने काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडे पाठवून दिली होती. परंतु दुरुस्ती देखभालीसाठी निधीची तरतूद न झाल्यामुळे त्या ठिकाणीच धूळ खात पडून होती. सांगोला ग्रामीण रुग्णालयास १०२ रुग्णवाहिकेअभावी महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेला जादा पैसे मोजून भुर्दंड सोसावा लागत होता. याबाबत आवाज उठवल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून सोमवारी नवीन १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सांगोला ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली.
नवीन रुग्णवाहिकेमुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील कुटुंब नियोजन व प्रसूतीच्या महिलांना ने-आण करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी नवीन रुग्णवाहिकेची पूजा करून स्वागत केले. याप्रसंगी सांगोला ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ :::::::::::::::
सांगोला ग्रामीण रुग्णालयास प्राप्त झालेल्या नवीन १०२ रुग्णवाहिकेचे छायाचित्र.