आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी पुन्हा एकदा संपावर जाण्याची तारीख निश्चित करण्याचा निर्णय आयोग कृती समितीने या बैठकीत घेतला. तत्पूर्वी २५ जानेवारी रोजी राज्यभरातील डेपो, युनिटच्या गेटवर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे.कामगारांच्या आयोग कृती समितीची १९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक झाली. यात नुकत्याच झालेल्या संपाच्या वेळी वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव आयोग कृती समितीने नाकारला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शिफारशीमध्ये पूर्वी प्रशासनाने देऊ केलेल्या २.५७ च्या सूत्राऐवजी २.३७ चे सूत्र दिलेले असून, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के केला आहे. घरभाडे भत्त्यामध्ये १० टक्क्यांंऐवजी ७ टक्के, २० टक्क्यांऐवजी १४ टक्के, ३० टक्क्यांऐवजी २१ टक्के घट केली आहे. सुधारित वेतनवाढीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ ऐवजी १ जानेवारी २०१८ पासून चार वर्षांसाठी करणे. या प्रस्तावामुळे एस. टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने उच्चस्तरीय समितीचा हा प्रस्ताव कृती समितीने फेटाळला आहे. संपासह अन्य आंदोलने करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार २५ जानेवारीला राज्यातील परिवहन महामंडळाच्या डेपो, युनिटच्या प्रवेशद्वारासमोर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील एस. टी. कामगारांचा त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी संपाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीस महाराष्टÑ एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, महाराष्टÑ एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, महाराष्टÑ मोटार कामगार फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी राजू भालेराव, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, विदर्भ एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पोहरे, एस.टी. कामगार, आयोग कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. ------------------------अपेक्षित वेतनवाढ नाही च्कामगारांच्या आयोग कृती समितीने वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला होता. त्याला नकार दिल्याने उच्चस्तरीय समिती न्याय देईल या भावनेने तमाम कामगार वर्ग निश्चिंत असताना समितीने ठेंगा दाखवून अपेक्षित वेतनवाढ न दिल्याने कामगारांवर पुन्हा संपावर जाण्याची वेळ आल्याचे आयोग कृती समितीचे म्हणणे आहे.
राज्यातील एस. टी. कामगार पुन्हा संपावर जाणार, २५ जानेवारीला अहवालाची होळी : नऊ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:52 PM
राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी पुन्हा एकदा संपावर जाण्याची तारीख निश्चित करण्याचा निर्णय आयोग कृती समितीने या बैठकीत घेतला.
ठळक मुद्दे२५ जानेवारी रोजी राज्यभरातील डेपो, युनिटच्या गेटवर उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणारकामगारांच्या आयोग कृती समितीची मुंबईत बैठकच्कामगारांच्या आयोग कृती समितीने वेतनापोटी १०७६ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाला सादर