करमाळा: माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यासह कुर्डूवाडी परिसरातील एकूण १६२ गावांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत ११४ गावातून मताधिक्य मिळवून आघाडीवर आहेत तर राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील हे अवघ्या ४८ गावातून आघाडीवर आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरासह ३६ गावांचा समावेश आहे. कुर्डूवाडी व ३६ गावातून राष्टÑवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांना २२ हजार १३५ मते मिळालेली असून, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना २२ हजार ५०८ मते मिळाली आहेत. खोत या भागातून ३७३ मताधिक्याने आघाडीवर आहेत. कुर्डूवाडी शहरात विजयदादांना अवघे ६०४ मताधिक्य व बबनदादा शिंदे यांचे गाव असलेल्या निमगाव टें. येथून १३७७ मताधिक्यासह सापटणेत १०९३ मताधिक्य, गवळेवाडी, शेडशिंगेवगळता कोणत्याही गावात विशेष मताधिक्य मिळालेले नाही. या उलट रोपळे, कव्हे, पिंपळखुंटे, कन्हेरगाव, कुर्डू, म्हैसगाव, चिंचगाव, अकुलगाव, भोसरे, रिधारे, तांदूळवाडी येथून सदाभाऊ खोत यांना चांगले मताधिक्य लाभले आहे. करमाळा शहरात विजयदादा ९७२ मतांनी आघाडीवर असले तरी तालुक्यातील जेऊर, साडे, सालसे, कोर्टी, जातेगाव, पोथरे, केत्तुर, केम, वांगी, कंदर या सर्वच मोठ्या गावातून सदाभाऊ खोत यांना आघाडी मिळालेली आहे. आ. शामल बागल यांच्या रावगाव, पोथरे या हक्काच्या बालेकिल्ल्यातील पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, वडगाव, भोसे, पिंपळवाडी, हिवरवाडी, मोरवड, पोथरे व रावगाव, वंजारवाडी येथे सदाभाऊंची शिट्टी चांगलीच वाजली आहे. विशेष म्हणजे आ. बागल यांच्या मांगी या गावातून विजयदादा यांना अवघी ४७ मते जादा मिळालेली आहेत. राष्टÑवादी काँग्रेसची नेतेमंडळी असलेल्या वीट येथील जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले,उम्रड येथील आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनदादा बदे, सावडी येथील जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक सतीश शेळके, पोथरे येथील पंचायत समितीच्या सभापती भाग्यश्री शिंदे, वाशिंबे येथील पंचायत समितीचे उपसभापती व आदिनाथचे संचालक नवनाथ झोळ, तानाजी झोळ, देवळाली येथील पं. स. सदस्य कल्याणराव गायकवाड, कंदर येथील भांगे-लोकरे, केम येथील तळेकर, वांगी भागातील शहाजीराव देशमुख, झरे येथील विलासराव पाटील, वरकुटे गावचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवलिंग सुकळे अशा मातब्बर पुढार्यांच्या गावातून विजयदादांना मताधिक्य मिळालेले नाही. आदिनाथचे संचालक व शिवसेनेचे नेते नारायण पाटील यांनी जेऊर व लव्हे येथून सदाभाऊ यांना भरभरून मताधिक्य बहाल केले आहे तर जिंतीच्या सरपंच सवितादेवी राजेभोसले, पारेवाडी येथील बाळासाहेब पांढरे, टाकळी येथील जि. प. उपाध्यक्ष सुभाष गुळवे, चिखलठाण येथील जि. प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथचे संचालक केरू गव्हाणे, रामवाडी येथील मकाईचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे यांनी विजयदादा यांना मताधिक्य दिले आहे.
--------------------
कुर्डूवाडी परिसरात बाजी ४करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी परिसरातील ३७ गावातून सदाभाऊ खोत यांनी ३७३ चे मताधिक्य मिळविले आहे. आ. शामल बागल यांचा बालेकिल्ला असलेल्या रावगाव गटात व संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन कार्यक्षेत्र असलेल्या म्हैसगाव, चिंचगाव, भोसरे या भागातून सदाभाऊंची शिट्टी चांगलीच वाजली आहे.