शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

सोलापुरातील श्रमिकांची साधू वासवानी बाग बनलीय दारूचा अड्डा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 8:15 PM

श्रमिकांसाठी निर्माण केलेल्या गुरुनानक चौकातील साधू वासवानी बाग सर्वसामान्यांसाठी कमी आणि गोंधळ घालणाºयांसाठी जास्त ठरली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी केवळ मोकळे मैदान होते. महापालिका आणि या परिसरातील नगरसेवकांच्या प्रयत्नातून बागेच्या सुशोभीकरणाचे काम झाले.या बागेला एका बाजूला तारेचे कंपाउंड नसल्याने ही बाग म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झाली आहे.

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : श्रमिकांसाठी निर्माण केलेल्या गुरुनानक चौकातील साधू वासवानी बाग सर्वसामान्यांसाठी कमी आणि गोंधळ घालणाºयांसाठी जास्त ठरली आहे़ फुटकळ मद्यपींसाठी तर हा दारूचा अड्डा बनला आहे़ सध्या या बागेला पाणीपुरवठाही होत नसल्याने हिरवळ नाहीशी झाली आहे. वाळलेल्या गवतावर पत्ते खेळणारे दिसतात. या बागेला एका बाजूला तारेचे कंपाउंड नसल्याने ही बाग म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी सुधारणा केलेल्या बागेची अवस्था आता बदलली आहे़ बाग कसली वाळलेले गवतच दिसते़ बागेच्या तिन्ही बाजूने दुकान-टपºयांनी वेढले आहे़ काही टपºयांचा मागचा दरवाजा या बागेतच केला गेला आहे़ प्रवेशद्वाराच्या कोपºयाला असलेल्या पत्र्याच्या खोलीजवळ बसून दुपारचा मिनीबार भरलेला असतो़ कोणी एकटाच मद्य प्राशन करीत बसलेला असतो तर कुठे तीन - चारजण एकत्र येऊन मद्य घेत बसल्याचेही दिसून आले. या बागेत सर्वसामान्यांपेक्षा उपद्रवी आणि अशांतता माजवणाºया लोकांची गर्दी सर्वाधिक दिसून येते.

दोन वर्षांपूर्वी केवळ मोकळे मैदान होते. महापालिका आणि या परिसरातील नगरसेवकांच्या प्रयत्नातून बागेच्या सुशोभीकरणाचे काम झाले. विविध झाडी लावण्यात आली़ आता या बागेत केवळ फिवळी फुले लगडलेले वृक्ष दिसते तर दुसरीकडे काही जुनी झाडे वाळत चाललेल्या अवस्थेत दिसतात़ सकाळी ११ वाजता भरलेला गोंधळ हा सायंकाळी ७ नंतर थांबलेला दिसून येतो़ या बागेत प्रवेशद्वाराच्या कोपºयाला केवळ तारेचे कं पाउंड बांधून ठेवले आहे़ त्यात ना गवत, ना खेळणी साहित्य़ त्यामुळे या बागेत खºया अर्थाने काहीच नाही म्हणून कुणीही येत नाहीत़ या बागेच्या प्रवेशद्वारावरचा रस्ताही पाण्याच्या टँकर वाहतुकीमुळे खूप खराब झालेला दिसून येतोय़ समस्यात अडक लेल्या बागेला नवे रुप लाभून देण्याची मागणी आहे.

तारेचे कंपाउंड अर्धवट - ही बाग तशी जुनी आहे़ शास्त्रीनगर, सिंधी कॉलनी, कुमठा नाका, केशवनगर या परिसरातील नागरिकांसाठी म्हणून ही बाग ओळखली जायची़ आता या बागेने ओळखच बदलली आहे़ ‘मद्यपींची बाग’ अशी वेगळी ओळख या बागेने निर्माण केलीय़ त्यामुळे खºया अर्थाने सर्वसामान्य या बागेत दिसत नाहीत़ बागेच्या प्रवेशद्वाराभोवती संरक्षक भिंत आहे, मात्र तिच्या विरुद्ध दिशेला लोखंडी पोल दिसतात पण तारा बांधल्या नाहीत़ त्यामुळे गुरुनानक चौकातून कोणीही, कधीही, कुठूनही प्रवेश करतो.

लहान मुलांच्या तोंडी शिव्यांची लाखोलीच- या बागेत बोटावर मोजण्याइतके मजूर, काही वृद्ध दुपारी बागेत येतात़ ते पहुडताच लहान मुलांचा गलका सुरु असतो़ क्रिकेट खेळणाºया मुलांमध्ये वादविवाद रंगतो़ त्याही पुढे जाऊन त्यांच्या तोंडी पाच मिनिटात अनेकदा आई-बहिणींचा उद्धार होताना ऐकायला मिळतो़ कधी-कधी ही लहान मुले अंगावर जाण्याचाही प्रसंग पाहायला मिळतो़ वयस्कर लोक हटकले की थोडावेळ शांतता आणि पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळतो.

जिक डे तिकडे बाटल्याच- बागेच्या कोणत्याही कोपºयाला जाल तर तिथे कचरा आणि त्यामध्ये पडलेल्या दारुच्या बाटल्या, फुटलेल्या बाटल्या, रिकाम्या बिसलरी बाटल्या आणि मद्यपान केलेले प्लास्टिकचे ग्लास दिसतील़ याबरोबरच बटाटा वेपर्सचे रॅपर, विडी-सिगारेटचे थोक डे, काडीपेटी, कॅरीबॅग असे विविध साहित्य दिसेल़ या बागेत स्वच्छता होताना दिसून येत नाही़ पूर्वी सायंकाळी गवतावर पाणी मारताना माळी दिसायचा़ अलिकडे तोही दिसत नाही़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका