आप्पासाहेब पाटील
रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) या बलाच्या जवानांकडून रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी, रेल्वे ट्रॅक, सिग्नलसह अन्य सर्व रेल्वेच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचे काम असते़ या रेल्वे सुरक्षा बलाचे सोलापूर विभागातील विभागीय सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांच्याशी साधलेला संवाद.
आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी काय सांगाल ?रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मध्ये काम करीत असताना अनेक प्रसंग सांगता येतील. आरपीएफमधील माझी पहिली नियुक्ती अहमदाबाद येथे सहायक सुरक्षा आयुक्त पदावर करण्यात आली होती़ त्यानंतर पदोन्नतीने राजकोट विभागात विभागीय सुरक्षा आयुक्त या पदावर करण्यात आली़ आता सोमवार २९ जुलैपासून सोलापूर विभागात विभागीय सुरक्षा आयुक्त पदावर नियुक्त झालो आहे.
सोलापूर विभागात नवीन काय करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर आहे. मी यापूर्वी फक्त अहमदाबाद व राजकोट या दोनच विभागात सुरक्षा आयुक्त पदावर काम केले आहे़ सोलापूर विभागात यापूर्वीपासून आरपीएफ जवानांचे चांगले काम आहे़ त्यात कोणताही बदल न करता आरपीएफ जवानांच्या कामाला प्रोत्साहन देऊन प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार आहे़ याशिवाय कर्मचाºयांना त्यांच्या कामासंदर्भात सेवासुविधा पुरविणार, रेल्वे सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करणार, कर्मचाºयांसाठी कल्याणकारी योजना राबविणार याशिवाय कामाच्या दृष्टिकोनातून व कौशल्यात सकारात्मक बदल करणार आहे़
आरपीएफ जवानांविषयी काय सांगाल? माझ्या काळात सोलापूर विभागातील जवानांच्या कामात गती आणून बंदोबस्त अथवा काम करीत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर वाढविता येईल, याविषयी प्रयत्न करणार आहे़
सोलापूर विभागातून प्रवास करणाºया प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षित प्रवास घडावा, यासाठी प्रयत्न असणार आहे. शिवाय अनधिकृत विक्रेते, दरोडेखोर, महिलांची सुरक्षा आदी कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आरपीएफ जवानांचे मनोबल वाढविण्यात येईल.
देशातील सर्वोत्तम सुरक्षा बल म्हणून रेल्वे सुरक्षा बलाचा गौरवरेल्वे सुरक्षा बल ही देशातील सर्वोत्तम सुरक्षा दलांपैकी एक आहे. हे एक सुरक्षा दल आहे जे देशातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे निरीक्षण करते़ आरपीएफ पोलीस जवान हे भारतीय रेल्वे विभागाशी संबंधित खाते आहे़ भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करीत आहे़ शिवाय देशविरोधी कार्यात रेल्वे सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो़ रेल्वे सुरक्षा बल हे केंद्रीय सैन्य सुरक्षा बल आहे, जे एक पर्यायी सैन्य बल म्हणून रेल्वे सेवेत प्रामाणिकपणे काम करीत आहे़ हे देशासाठी गौरवास्पद आहे़