सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ४७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मोळी पूजन करून करण्यात आला.
यावेळी मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. रामभाऊ सातपुते, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, झेडपी सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, संगीता मोटे, सुनंदा फुले, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, माणिक कर्णवर, मामासाहेब पांढरे, राहुल वाघमोडे, रावसाहेब मगर, मिलिंद कुलकर्णी, बाबाराजे देशमुख, प्रकाश पाटील, संग्राम जहागिरदार, बाळासाहेब सरगर, सोपान नारनवर यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते.
गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही
बंद कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाची सुरुवात झाली असली तरी सभासद व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची आवश्यकता आहे. तरच थकीत बिले देणे शक्य होणार आहे. पुढील वर्षी कारखाना सुरू होण्यापूर्वी सभासदांची बिले अदा होतील. यावर्षी ५० हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून पुढीलवर्षी चार लाख टन उसाचे गाळप करून कारखान्याला लवकरच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास सहकार महर्षीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.