शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

सैराट अन् प्रेमिस्ते.. प्रेमाची परिभाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:22 AM

प्रेमिस्ते ही मुरुगन आणि ऐश्वर्या यांची प्रेमकथा. मदुराई शहरातील मेकॅनिकचे काम करणाऱ्या मुरुगनचे आयुष्य अगदी साधेसुधे होते. एकेदिवशी उच्चकुलीन ...

प्रेमिस्ते ही मुरुगन आणि ऐश्वर्या यांची प्रेमकथा. मदुराई शहरातील मेकॅनिकचे काम करणाऱ्या मुरुगनचे आयुष्य अगदी साधेसुधे होते. एकेदिवशी उच्चकुलीन श्रीमंत मुलीचे त्याच्यावर मन जडते. तिथून मुरुगनच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यांच्यातला विभिन्न भेद समजावून आपले नाते जुळू शकत नाही हे तो सांगतो; मात्र ऐश्वर्याला काही ऐकून घ्यायचं नसतं. अखेर दोघांचे एकमत होते. पळून जाऊन मित्र स्टीफनच्या मदतीने ते लग्न करतात. आपल्या मुलीने परजातीतील गरीब मुलाशी लग्न केल्याचे कळताच ऐश्वर्याचे वडील संतापतात. नवदांपत्याला भुरळ पाडून चेन्नईवरून मदुराईला बोलावले जाते. वाटेत ऐश्वर्याच्या फार्महाऊसपाशी अडवले जाते, तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे नातलग त्यांच्यावर हल्लाबोल करतात. ऐश्वर्याचे वडील मुरुगनला क्रूरतेने बेदम मारहाण करतात. ऐश्वर्याच्या गळ्यात बांधलेले मांगल्यम तिने आपल्या हाताने काढून फेकून द्यावे म्हणून जीवावर उठतात. अखेर ऐश्वर्या ते तोडून फेकून देते. अर्धमेला झालेला मुरुगन मांगल्यमचा धागा हातात घेऊन तिथून खुरडत खुरडत निघून जातो. काही दिवसांनी ऐश्वर्याचे लग्न इच्छेविरुद्ध लावले जाते. ती सासरी जाते, तिला मुलबाळ होते. तिच्या पतीचे तिच्यावर प्रेम असते. अशीच वर्षे निघून जातात.

एकेदिवशी ती इलाजाच्या निमित्ताने चेन्नईला जाते तेव्हा एका ट्रॅफिक सिग्नलवर मळकटलेला वेडा भिकारी तिला दिसतो. पुढच्याच क्षणी तिच्या लक्षात येते की हा तर मुरुगन ! त्या रात्री ती पतीच्या नकळत त्याला शोधत पुन्हा सिग्नलपाशी येते तर तो तिथेच हातवारे करत पुटपुटत उभा असतो, त्याच्या बोटांना करकचून बांधलेला मांगल्यमचा धागा अगदी त्याच्या कातडीत रुतलेला असतो. त्याला तशा अवस्थेत पाहून भररस्त्यात मध्यरात्रीस ऐश्वर्या टाहो फोडून आक्रोश करू लागते. इतक्यात तिचा पती तिथे येतो, आधी ती भेदरते; मात्र तो पुढे होत मुरुगनला आपल्या कवेत घेतो.एका बाजूला ऐश्वर्या नि दुसऱ्या बाजूला मुरुगनला घेऊन तिथून निघतो. इथे चित्रपट संपतो. श्रेयनामावलीसोबतच माहिती येते की ऐश्वर्याचा पती मुरुगनला आपल्या सोबत नेतो आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करतो.

सिनेमा संपतो तेव्हा प्रेक्षक अक्षरशः धाय मोकलून थिएटरमध्ये रडलेले दिसले. नंतर याचे कन्नड, बंगाली, मराठी रिमेक बनवले गेले. प्रेमिस्तेने प्रेमाकडे कसे पाहायचे याची नवी दृष्टी दिली. २०१६ सालच्या 'सैराट'मध्ये अशीच कथा होती मात्र त्याचा पट आणि शेवट दोन्ही भिन्न होते. सैराटने मनातले मळभ रिते केले असले तरी त्यातून मन विषण्ण करणारी सत्यता समोर आली होती, तर प्रेमिस्तेने प्रेमाचा त्यागाचा नवा अध्याय लिहिला ! विशेष म्हणजे सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरून दाद दिली होती.

‘प्रेमिस्ते’मध्ये नायक-नायिकेची भूमिका करणाऱ्या भारत, संध्यासाठी या सिनेमाचे दक्षिण दरवाजे कायमचे खुले झाले. सोलापूरची बहुभाषिक संस्कृती समृद्ध करण्यात अशा चित्रपटांचा मोठा वाटा आहे कारण यामुळेच शहरातला एकजिनसीपणा वाढला आहे. तेलुगू मायमराठीची ही बहीण आहे आणि या बहिणीने इथल्या जनतेला खूप प्रेम दिले आहे. हाही एक भाषाप्रेमाध्यायच होय !

- समीर गायकवाड (लेखक साहित्य, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)