शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ?

By appasaheb.patil | Published: October 07, 2022 4:41 PM

रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव! सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून रविवार ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण २९  कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे ७५ महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. सोमवार, १० ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, फोक आर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका (मराठी, हिंदी) आदी स्पर्धा पार पडतील. मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी, निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील. 

बुधवार, दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या  हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत.  या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते. 

वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोखयंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरRinku Rajguruरिंकू राजगुरू