सोलापूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीला परवानगी देण्याची चर्चा सुरु असली तरी सोलापुरात देशी आणि विदेशी दारु दुकाने उघडण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी १७ मे रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविल्यामुळे सोमवार दि. ४ मे पासून नवीन आदेश जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत काय सुरू राहिल आणि काय बंद राहिल याबाबत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी रविवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे आदेश जारी केले आहेत.
शहरात संचारबंदी जाहीर झाल्यापासून राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे कामकाज बंद करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून बँका बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या गैरसोयीला तोंड देताना ग्राहकांची बँका सुरू करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत होती . या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बँका सुरू करण्याचा निर्णय घेतला .
शिक्षक संघटनांनी संचारबंदीच्या काळात बँकेचे कामकाज सुरू करण्याची मागणी लावून धरली होती .परंतु सोलापूर शहर आणि परिसरातील कोरोना विषाणूंच्या प्रादुभार्वाची संख्या वाढत राहिल्याने प्रशासनाने कडक उपाय योजना हाती घेतल्या होत्या , त्याचाच एक भाग म्हणून संचारबंदी लागू करून बँका बंद करण्यात आल्या होत्या .
हे राहिल बंद...
- - चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, वॉटरपार्क, म्युझीयम, शहरी, ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, निवासी व आश्रम शाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सर्व मनोरंजन व पर्यटनाची ठिकाणे, खाजगी कोचिंग क्लास. पण या काळात सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनातील काम करणारे अधिकारी, शिक्षक, कर्मचाºयांनी मुख्यालयात रहायचे आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयात फक्त पत्रव्यवहार करता येईल.
- - जिल्ह्यातील श्री. विठ्ठल रुक्मिणी, श्री. स्वामी समर्थ , सिद्धेश्वर या मंदिरांसह सर्व मंदिरे, पार्थनास्थळ, चर्च आणि दर्गाह. मंगलकार्यालय, जिल्'ातील सर्व खरेदी विक्री कार्यालय (दुय्यम निबंधक, दस्त नोंदणी), ई सेवा केंद्र, सेतू सुविधा व आपले सरकार केंद्र, पानटपरी,सर्व आठवडी, बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स, सार्वजनिक बस, रिक्षा, कॅब, मिठाई दुकाने, केशकर्तनालय, भाजीपाला, फळे हातगाडीवर फिरून विक्रीस बंदी,खाजगी, सरकारी समारंभ, कार्यक्रमास पाचपेक्षा जास्त जणांना परवानगी नसेल, अंत्यसंस्कारासही २0 जणांना परवानगी असेल,प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता कोणासही प्रवेश नाही, बाजार समितीत भाजीपाला व फळे विक्रीचे लिलाव होणार नाहीत.
- - शहरातील देशी विदेशी मद्य, बिअर व ताडी विक्रीची दुकाने बंद राहतील. शहरातून बाहेर गेल्यास त्यांना परत येता येणार नाही. प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणीही नागरिक सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात घराबाहेर पडू शकणार नाही
हे राहिल सुरू
- - अत्यावश्य सेवा: रुग्णालये, अॅम्बुलन्ससेवा, यासंबंधी डॉक्टर व कर्मचारी, पोलीस व कायदा सुव्यवस्थेत गुंतलेल्या व्यक्ती, शासनाची परवानगी दिलेल्या चार चाकी वाहनात दोन तर दुचाकीवर एकजणला सवलत असेल.
- - दूध विक्री व वाटप: वेळ सकाळी ६ ते ९, बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला फळे खरेदी करता येतील वेळ : सकाळी ६ ते ९, कुंंभार वेस, बाजार समिती, मधला मारूती, मंगळवारपेठ येथील होलसेल किराणा व भुसार माल खरेदी: सकाळी ७ ते ११, किराणा दुकान: ७ ते ११, किरणा पुरवठा ठोक विक्रेते: ७ ते ११.
- - शेतकºयांना महापालिकेच्या २१ मंडईत भाजीपाला, फळे विक्रीस मुभा: ७ ते ११, खते, किटकनाशके, बियाणे विक्री: ७ ते ११, कृषी यंत्र, सुटे भाग व दुरूस्ती दुकान, रेशन दुकान, घरपोच सेवा देणारे किराणा व भुसार माल: ७ ते ११.
- -एटीएम: पूर्ण वेळ, दवाखाने, मेडीकल, दिलेल्या वेळेत, गॅस वितरण, होम डिलीव्हरी: ७ ते १२, बेकरी: ७ ते ११, बँका: ८ ते १२,फिजीकल डिस्टन्स, मास्क बंधनकारक खरेदी व विक्री वेळेस फिजीकल डिस्टन व मास्क बंधकारक आहे.